Kolhapur : मुलीला वारंवार घरी बोलावून नंतर अश्‍लील व्हिडीओ बनवले अन्; कोल्हापुरातील घटनेने खळबळ

मुलीला घरी बोलावून तिच्यावर जबरदस्ती करून अश्‍लील व्हिडीओ बनविणाऱ्या तरुणाला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. (called )अनुपम मनोहर दाभाडे वय ३५, रा. व्यंकटेश रेसिडेन्सी, इंगळेनगर असे त्याचे नाव आहे. सप्टेंबर २०२४ ते जून २०२५ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे पीडित मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.

नाटक व रंगकर्मी व्यवसायातून दाभाडे याची पीडित मुलीशी ओळख झाली होती. (called )तिच्याशी ओळख वाढवून तो वारंवार भेटण्यासाठी घरी बोलवायचा. सप्टेंबर २०२४ ते जून २०२५ कालावधीत त्याने पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले.तसेच याचे व्हिडीओ बनवले होते. (called )या व्हिडीओच्या आधारे तो मुलीला धमकी देत होता. याबाबत पीडितेने राजारामपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून संशयिताला अटक करण्यात आली.

हेही वाचा :