Kolhapur : पोरांच्या खेळात शेतकरी बापाचा गेम झाला, बँक अकाऊंट खाली, म्हशीही गेल्या!

मुलांच्या ऑनलाइन गेमच्या नादापायी बापाला 5 लाखांचा चुना लागल्याची घटना कोल्हापूरच्या राधानगरीत घडली आहे.(game)या घटनेमुळे शेतकरी बाप चांगलाच संकटात आला असून म्हशी घेण्यासाठी जमवलेले पैसे असे लुटले गेल्यानं पैसेही गेले अन् म्हशीही गेल्या अशी त्याची परिस्थिती झाली आहे.कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील शेतकऱ्याच्या मुलांना लागलेला फ्री फायर या मोबाईल गेमचा नाद बापाच्या चांगलाच अंगलट आला. मोबाईल गेमच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी या शेतकऱ्याला तब्बल 5 लाखांना लुटलंय. या गेममध्ये पुढे जाण्यासाठी या मुलांना शस्त्रखरेदी करण्यास भाग पाडण्यात आलं. या व्हर्च्युअल शस्त्रखरेदीसाठी मुलांना एक लिंक पाठवण्यात आली. या लिंकवर मुलांनी क्लिक केलं आणि तिथेच सगळा गेम झाला.

या शेतकऱ्याने काबाडकष्ट करुन म्हशी घेण्यासाठी बँकेत 7 लाख रुपये जमवले होते, मात्र एका फटक्यात त्यातील 5 लाख रुपये लुटले गेले. शेतकऱ्याला याची कल्पनाही नव्हती. म्हैस खरेदी करण्यासाठी तो बँकेत पैसे काढण्यासाठी गेला अन् त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. पैसे लुटल्याच्या 2 महिन्यानंतर त्याला या चोरीचा पत्ता लागलाय. (game)ही तक्रार वेळेत झाली असती तर त्याचे पैसे परत मिळाले असते.

फ्री फायर हा एका बेटावर खेळला जाणारा सरव्हायवल मोबाईल गेम आहे. यात 10 मिनिटांचा एक राऊंड असतो. या गेममध्ये खेळणाऱ्याला बेटावरुन सहीसलामत बाहेर पडायचं असतं, त्याला रोखण्यासाठी इतर ऑनलाईन 49 खेळाडू असतात, त्या सगळ्यांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी त्याला वेगवेगळी व्हर्च्युअल शस्त्र खरेदी करावी लागतात. या शस्त्रखरेदीसाठी लिंक पाठवण्यात येतात आणि त्यातच सायबर चोरटे हात साफ करुन घेतात.

कोणत्याही लिंकवर खात्रीशिवाय क्लिक करु नये, असं आवाहन वारंवार सायबर विभागाकडून करण्यात येतं, पण गेम खेळण्याच्या नादात मुलं त्याकडे लक्ष देत नाहीत अन् असे प्रकार घडतात, त्यामुळे पालकांनीही मुलांच्या हाती मोबाईल देताना काळजी घेणं गरजेचं आहे. (game)आपली मुलं फोनवर काय करतात याकडे लक्ष देण्यासोबतच फोनमधील नेट बँकिंग, ऑनलाईन पेमेंटचे अॅप सुरक्षित ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

हेही वाचा :