कोल्हापुर : शाहू महाराजांना संसदेत पाठवण्यासाठी मविआची वज्रमूठ सभा

शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीकडून कोल्हापुरात वज्रमुठ सभेचे आयोजन (change)करण्यात आले होते. यावेळी मविआच्या नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

निसर्गाचा नियम आहे, जेव्हा काही चांगलं होत नाही. तेव्हा परिवर्तन होत असतं आणि आता परिवर्तन समोर दिसत आहे. ते परिवर्तन आपल्याला घडवून आणायचं आहे. ते परिवर्तन मतपेटीतून घडवून आणायचं आहे. यासाठी काँग्रेस आणि माझ्या नावासमोरच बटन दाबून घडवायचा आहे. यासाठी आपण सर्वजण मला साथ देणार हे मी गृहीत धरतो, असं म्हणत महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी शहरात लोकसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे.

सध्या लोकशाही धोक्यात आली आहे. काही जणांकडून लोकशाहीच्या(change) माध्यमातून एकाधिकारशाही निर्माण करण्यात येत आहे आणि एकाधिकारशाहीमधून हुकूमशाहीमध्ये परिवर्तन कधीही होऊ शकतं. त्यामुळे आपण सावध राहायला हवं. आपल्याला लोकशाही हवी की एकाधिकारशाही हे आपण आता ठरवलं पाहिजे, असेही शाहू महाराज यावेळी म्हणाले आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरात आज वज्रमुठ सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या सभेला शाहू महाराज छत्रपती, संभाजीराजे छत्रपती यांच्यासह इंडिया आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरेगट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, यासह सर्व घटक पक्षातील नेते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संभाजी राजे छत्रपती यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

कोल्हापूर लोकसभेची ही निवडणूक पक्षाच्या पलीकडे गेलेली(change) निवडणूक असून सगळ्यांच्या तोंडात आता बदल हवा आहे, हीच चर्चा आहे. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांनी ठरवलं की शाहू महाराजांना निवडणूकीत उभं करायचं, पण शाहू महाराज तयार नव्हते. मात्र दिल्लीतील वातावरण गढूळ झालं आहे. लोकशाही बद्दल शंका निर्माण होत आहे. संविधान धोक्यात आलेलं आहे. अशावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा आणि पुरोगामी विचार हा दिल्लीत गेल्याशिवाय जी घाण निर्माण झाले ही दुरुस्त होणार नाही. म्हणून लोकांच्या आग्रहास्तव शाहू महाराजांनी मोठ्या मनाने निवडणूक लढण्याचं स्वीकार केलं, असं संभाजीराजे यावेळी म्हणाले आहेत.

तसेच केंद्रात काय चालू आहे हे बोलण्यापेक्षा त्याआधी राज्यात काय चालू आहे हे बोलणं महत्त्वाचं आहे. नेते मंडळी कोण पाहिजे तिथे उड्या मारत आहे. कोल्हापुरातील अनेक नेतेमंडळी जी आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन चालणारी आज स्वतःच्या सोयीसाठी आपले मूळ विचार आणि स्वाभिमान बाजूला ठेवून राजकीय पोळी भाजण्यासाठी इकडे तिकडे उड्या मारायचा प्रयत्न करत आहेत, असे म्हणत विरोधकांवर टीका केली आहे.

हेही वाचा :

हेलिकॉप्टरने मतदार आणण्याची तयारी, त्यांनी किती पैसा गोळा केला जयंत पाटील यांची हसन मुश्रीफांवर सडकून टीका

हनिमूनला गेल्यावर कपल्सने कधीच करु नका या 5 चूका

भुजबळ लोकसभेला उभे राहुद्या मग सांगतो मनोज जरांगेंचा मोठा इशारा