लै बेक्कार! भर वर्गात शिक्षकांमध्येच तुंबळ हाणामारी Video Viral

शाळेमध्ये मस्तीखोर विद्यार्थी शिक्षक(teachers) वर्गात नसले की एकमेकांना भिडतात. मस्ती आणि हाणामाऱ्या करतात. विद्यार्थ्यांच्या अशा हाणामाऱ्या तुम्ही स्वत: देखील अनेकदा पाहिल्या असतील. विद्यार्थ्यांचा प्रताप शिक्षकांना समजला की त्यांची काही खैर नसते. शिक्षक विद्यार्थ्यांना चांगलाच चोप देतात. अशात आता थेट दोन शिक्षकांनीच विद्यार्थ्यांसारखं कृत्य केलं आहे.

शाळेत शिकवणाऱ्या दोन शिक्षकांनी(teachers) वर्गातच एकमेकांची कॉलर पकडलीये. दोघांनी एकमेकांना चापटी आणि जोरजोरात बुक्क्या मारल्या आहेत. शिक्षकांची ही हाणामारी सुरू असताना वर्गातील अन्य शिक्षकांनी त्यांचा व्हिडिओ आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या दिंडोरीत ही घटना घडलीये. दिंडोरीतल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ३ मध्ये २ महिन्यांपूर्वी नवनियुक्त केंद्रप्रमुखांची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीदरम्यान पूर्ववैमनस्यातून दोन शिक्षकांमध्ये शाब्दीक चकमकीनंतर तुंबळ हाणामारी झाली. केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांसमोरच दोन शिक्षकांमध्ये ही हाणामारी झाली आहे.

संबंधित शिक्षकांवर दोन महिन्यांनंतरही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र २ महिन्यानंतर या दोन्ही शिक्षकांच्या हाणामारीचा व्हिडिओ अचानक व्हायरल झाला आहे. आता व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांच्या फोनवर देखील पोहचला आहे. आपले शिक्षक सुद्धा अशी हाणामारी करतात हे पाहून विद्यार्थ्यीही थक्क झालेत. या प्रकरणी आता जिल्हा परिषद प्रशासनाकडून काय कारवाई होणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सोशल मीडियावर याआधी शिक्षकांच्या चुकीच्या वर्तनाचे असे बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक वर्गात झोपत आहेत, विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करत आहेत, खरा शिक्षक वर्गात उपलब्धच नाही, असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

हेही वाचा :

श्रुती हासन आणि शांतनु हजारिकाचा ब्रेकअप…

कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचा दुचाकीस्वारांना दणका

धक्कादायक! 8,000हून अधिक आयआयटीयन विद्यार्थी बेरोजगार