‘तो’ नेता राष्ट्रवादीत प्रवेश करणार, राज्याच्या राजकारणाला कलाटणी…; सुनिल तटकरे

राज्यातील लोकसभेची निवडणूक(earthquake) पाच टप्प्यात पार पडली आहे. निकाल ४ तारखेला लागणार आहे. त्याआधीच राज्यातील पक्षांना विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यापार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस(earthquake) अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केला असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच इनकमिंग होणार असल्याचा दावा केला आहे. राज्यातील काही नेते आपल्या आणि अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा त्यांनी दावा केला आहे. विधानसभेसाठी संघटन मजबूत करण्याचे आम्ही ठरवलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक आहे.

10 तारखेला वर्धापन दिन आहे. त्याच दिवशी ही नियोजन आम्ही करणार आहोत. महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश होणार आहे. हा प्रवेश महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी देणार असेल, असा दावा सुनिल तटकरे यांनी केला आहे.

सगळ्यांनी आपापल्या प्रतीने काम केलं. देशात आणि राज्यात काय होणार ह्याकडे सर्वांच लक्ष आहे. चार जूनच्या चर्चा सर्व वारंवर होत आहे. विजय आमचाच होणार आहे. 27 तारखेला राष्ट्रवादीची बैठक गरवारे क्लबमध्ये आयोजित केली आहे. सर्व नेते पधाधिकारी जिल्हाप्रमुख सगळ्यांना बोलावलं आहे. आता आम्ही स्पष्टपणे धोरण बांधलेलं आहे. एकच लक्ष विधानसभा धोरण… त्यामुळे अनेक पक्षप्रवेश या दिवशी होतील, असंही तटकरे म्हणाले आहेत.

राज्यातला 5 टप्प्यांचा निवडणुका 20 तारखेला संपल्या. 60% आसपास मतदान झाले. मतदान करण्यासाठी मतदार उत्सपृतपणे मतदान करण्यासाठी आला. राष्ट्रीय पातळीची निवडणूक आणि राष्ट्रीय मुद्दे मांडण्याचा प्रयत्न महायुतीने केला. विरोधकांना गल्ली बोलांपासून वेगवेगळ्या उत्तर देण्यात वेळ गेला. जी भाषा वापरण्यात आली त्या भाषेला छेद देण्याचा प्रयत्न देण्यात आला. या मुद्द्यावर महायुतीला राह्यभरत चांगलं यश मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2014 आणि 2019 ला जसा प्रतिसाद मिळाला तसंच आताही मिळाला, असं सुनिल तटकरे म्हणाले.

महायुतीची समन्वयक बैठक बोलवावी हा ही एक मुद्दा आहे. राष्ट्रवादी पक्ष हा विधानसभेच्या अनुषंगाने ग्रामस्तरापासून सगळीकडे पोहचणार आहे. आगामी विधान सभेच्या निवडणुकी वर आमचे विशेष लक्ष आहे. पाणी टंचाई आणि दुष्काळ ह्यावर राज्य सरकार बैठक घेत आहे. पाणीटंचाईवर सरकारने उपाय योजना कराव्यात. अवकाळी पावसावर ही उपाययोजना कराव्यात राज्य सरकारला विनंती आहे, असंही सुनिल तटकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा :

शिखर धवन पुन्हा एकदा अडकणार विवाहबंधनात? मिताली राजशी…

विको कंपनीचे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचे वयाच्या 85व्या वर्षी निधन

लहान मुलाला विचारलं, तरी त्याला माहिती आहे की नवनीत राणा पडणार; बच्चू कडू