तळीरामांची चांदी! देशभरात दारू होणार स्वस्त?
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल 23 जुलैरोजी देशाचा अर्थसंकल्प(budget) सादर केला.त्यांनी आयकराच्या नवीन कर प्रणालीत काही बदलाची घोषणा केली. यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर, ज्यात सीमा शुल्क, जीएसटीसह इतर करांचा समावेश आहे, त्यात काही बदल केले. या नवीन तरतुदीमुळे दारु स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केंद्र सरकारने(budget) कलम-9 मध्ये सुधारणा केली असून ईएनए हे केंद्रीय जीएसटीच्या परीघा बाहेर करण्याचा निर्णय घेतला आहे. ENA म्हणजेच एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहोल, ज्याचा वापर अल्कोहोल बेव्हरेजेस तयार करण्यासाठी करण्यात येतो. केंद्र सरकारने सीजीएसटी सह इंट्रिग्रेटेड जीएसटी आणि टेरिटेरी जीएसटी मध्ये बदल करण्यासाठी देखील शिफारस केली आहे.
आतापर्यंत ENA वर GST लावला जात होता, पण दारूवर नाही. यामुळे मद्यनिर्मिती कंपन्यांना अडचणी येत होत्या. त्यांना कच्च्या मालावर जीएसटी भरावा लागत होता, परंतु त्यांना त्याचा फायदा घेता येत नव्हता. आता केंद्र सरकारने ENA ला GST च्या कक्षेतून वगळले आहे. याचा अर्थ आता राज्य सरकारे त्यावर कर लावू शकतील.
या निर्णयामुळे देशातंर्गत व्यापार आणि परदेशातून होणारी आयात यावरील खर्चात कपात होईल. जीएसटी परिषदेच्या बैठकीत याबाबत स्पष्टता येईल. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारने जर ईएनए संदर्भात निर्णय घेतला तर कंपन्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. मद्यविक्रीवरील कर राज्य सरकारच्या अखत्यारित्या येतो. त्यामुळे राज्य सरकारने जर या संदर्भात तयारी दाखवली तर दारूची किंमत कमी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
ऐश्वर्या रायसाठी मोठं गिफ्ट, घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान बच्चन कुटुंबात ‘गुडन्यूज’
“बिहारला पूरस्थितीसाठी 18 हजार कोटी, महाराष्ट्रातील पूर दिसत नाही का?”
टॉपलेस होऊन अंगाला गुलाब लपेटून ‘या’ अभिनेत्रीने चुकवला काळजाचा ठोका