महाराष्ट्राला मिळणार 6600 मेगावॅट वीज; अदानी समूह करणार वीज पुरवठा
मुंबई : महाराष्ट्राला पुढील 25 वर्षे 6600 मेगावॅट वीज(electricity) पुरवठा करण्याचे कंत्राट अदानी पॉवर या अदानी समूहाच्या कंपनीला मिळाले आहे. अदानी पॉवर ही वीज अपारंपारिक आणि औष्णिक प्रकल्पातून ही वीज निर्माण करणार आहे. राजस्थानातील जैसलमेर येथील पवन-सौर ऊर्जा प्रकल्पातून अदानी ग्रीन एनर्जी मार्च 2023 पासून मुंबईला हरित ऊर्जेचा पुरवठा करत आहे.
नवीन करारामुळे अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पॉवर यांना महाराष्ट्रात त्यांचा विस्तार वाढवता येईल. अदानी ग्रीन एनर्जी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खवडा येथील त्यांच्या अक्षय ऊर्जा पार्कमधून ५ हजार मेगावॅट सौर उर्जा पुरवेल आणि अदानी पॉवर नवीन प्लांटमधून १,६०० मेगावॅट औष्णिक ऊर्जा महाराष्ट्राला पुरवेल.
2028 पर्यंत 32 टक्के वीज(electricity) अपारंपारिक उर्जा स्त्रोतांपासून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने अदानी पॉवरला कंत्राट दिल्याचे अधिकृतरित्या पत्र जारी केले आहे. दोन्ही कंपन्यांशी संबंधित वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र करार केला जाईल, असे अदानी पॉवरने एका निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्रातील विजेचा वापर २०२८ पर्यंत २०० टेरावेंट तासांपर्यंत पोहोचणे अपेक्षीत आहे. त्यातील ३२ टक्के वीज अपारंपरीक ऊर्जा स्त्रोतांपासून अपेक्षित आहे.
हेही वाचा:
“साडी नेसणारी पोरगी पाहिजे” म्हणत सूरज चव्हाण लाजला, अभिजीतची मजेशीर प्रतिक्रिया!
Tesla ट्रकने अचानक घेतला पेट; भीषण आग विझवण्यासाठी लागले दोन लाख लिटर पाणी!
बिग बॉस प्रेमींची मागणी: रितेश-निक्कीला पाठिंबा, महेश मांजरेकरांना परत आणा!