सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हेल्दी अन् टेस्टी पोहा चिला
सकाळच्या नाश्त्यामध्ये पोहे खायला सगळ्यांनाच(breakfast) आवडतात. चवदार लागणारे पोहे पचायला हलके आणि पौष्टिक असून त्यापासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. परंतु, तुम्ही कधी पोह्यांपासून बनवलेला हेल्दी चिला खाल्ला आहे का? जर नसेल खाल्ला तर आजचा हा लेख शेवटपर्यंत वाचा.
कारण, आज आम्ही तुम्हाला पोहा(breakfast) चिला रेसिपीबद्दल सांगणार आहोत. बनवायला अतिशय सोपी असणारी ही रेसिपी अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्ही करू शकता. शिवाय, हा पोहा चिला बनवण्यासाठी तुम्हाला फार साहित्याची गरज पडत नाही. चला तर मग जाणून घेऊयात पोहा चिला बनवण्याची सोपी रेसिपी.
पोहा चिला बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- १ वाटी पोहे
- बेसन पाऊण वाटी
- ओट्स पावडर अर्धी वाटी
- किसलेले गाजर १
- बारीक चिरलेला कांदा १
- बारीक चिरलेला टोमॅटो १
- कोथिंबीर बारीक चिरलेली
- हिरवी मिरची बारीक चिरलेली
- १ चमचा हळद
- लाल तिखट १ चमचा
- धना पावडर अर्धा चमचा
- चवीनुसार मीठ
- आवश्यकतेनुसार तेल किंवा तूप
पोहा चिला बनवण्याची सोपी पद्धत :
- पोहा चिला बनवण्यासाठी सर्वात आधी पोहे चांगले धुवून घ्या. त्यानंतर, त्यातले पाणी काढून टाका आणि सुमारे १० मिनिटे असेच ठेवा.
- आता पोहे चांगले स्मॅश करून घ्या.
- त्यानंतर, बेसन आणि ओट्स पावडर पोह्यांमध्ये मिक्स करून घ्या.
- आता यामध्ये किसलेले गाजर, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घाला.
- आता या मिश्रणात हळद, लाल तिखट, धना पावडर आणि मीठ घालून मिक्स करून घ्या.
- आता या मिश्रणात अर्धा कप पाणी घालून चिलासाठीचे पीठ तयार करून घ्या.
- त्यानंतर, गॅसवर नॉनस्टिक पॅन गरम करायला ठेवा.
- आता यावर तेल किंवा तूप पसरून घ्या आणि पोहा चिल्याचे मिश्रण गोलाकार आकारात पसरून घ्या.
- हा चिला दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत चांगला शिजवून घ्या.
- आता तुमचा गरमागरम पोहा चिला तयार आहे.
- तुमच्या आवडत्या टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणीसोबत हा गरमागरम चिला सर्व्ह करा.
हेही वाचा :
अनन्या पांडे आणि आदित्य रॉय कपूर यांचे दोन वर्षानंतर ब्रेकअप
भाषणापूर्वी राज ठाकरे उठले, नितेश राणेंचा हात पाहिला
मनसेचे ‘इंजिन’ सोडून कीर्तिकुमार शिंदे यांनी बांधले ‘शिवबंधन’