डॉक्टरांचा निष्काळजीपणा! प्रसूतीनंतर महिलेच्या गर्भाशयात कापड राहिलं

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांचा निष्काळजी पणा महिलेच्या जीवावर बेतलं आहे. नॉर्मल प्रसूती केल्यानंतरही कापड गर्भ पिसवित विसरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

भंडारा जिल्ह्याच्या तुमसर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे तामसवाडी येथील हिमानी हरिराम पांडे ही महिला पहिल्या प्रसूती करिता उपजिल्हा रुग्णालय येथे 24 एप्रिलला दाखल करण्यात आले 25 एप्रिलला तिची नॉर्मल प्रसूती झाली नॉर्मल प्रसूतीनंतर रक्तस्राव होऊ नये म्हणून कापड ठेवलं जातं तो कापड 12 ते 24 तासाच्या आत काढावा लागतो मात्र येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तो कापड न काढता नॉर्मल प्रसूती झालेल्या त्या महिलेला 27 तारखेला रुग्णालयातुन सुट्टी देण्यात आली. घरी गेल्यावर तिन चार दिवसानी तिला असह्य वेदना होऊ लागल्या व घरात घाण वास येऊ लागल्याने महिला घाबरली व तत्काळ खासगी रुग्णालय गाठलं. त्यावेळी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्या गर्भाशयात कापड असल्याचे सांगितलं, तेव्हा महिलेला धक्का बसला.

वेळीच उपचार करून ते कापड काढण्यात आलं. मात्र ते कापड 24 तासांत काढलं नसल्याने आतमध्ये पूर्ण सडलेल्या अवस्थेत होतं व महिलेच्या शरीरात संसर्ग पसरला होता. अश्या प्रकारात अनेक महिलांनी जीव सुद्धा गमावला आहे. हा प्रकार उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाने घडला असून प्रसूती दरम्यान वैद्यकीय अधीक्षक लहान मुलांचे डॉक्टर, स्त्रीरोग तज्ञ हजर राहत नसल्याने असे प्रकार घडत आहेत.

नुसते परिचारिकेच्या जबाबदारीवर येथे प्रसूती केली जाते. येथील वैद्यकीय अधिक्षकावर जिल्हा शल्यचीकित्सक यांच्या आशीर्वाद असल्याने जिल्हा प्रशासनसुद्धा लक्ष देत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या धोकादायक घटना घडतात सदर घटनेची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणी महिलेच्या पतीने केली आहे.