हिवाळ्यात आरोग्यदायी कारल्याचा रस बनवा घरच्या घरी झटपट रेसिपी

राज्यभरात सगळीकडे थंडीची वारे वाहू लागले आहेत. थंडी वाढल्यामुळे (juice)सगळीकडे लोक उबदार कपडे परिधान करून आरोग्याची काळजी घेतली जात आहे . या दिवसांमध्ये आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. सर्दी, खोकला, सतत ताप येणे, हाडांमधील वेदना, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे इत्यादी अनेक समस्या या दिवसांमध्ये वाढू लागतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आहारामध्ये फळे, पालेभाज्या यांच्यासह ड्रायफ्रुटस इत्यादी पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे.

थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेतली जाते. पण तरीसुद्धा अनेक लोक सतत आजारी पडतात. सतत आजारी पडल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन (juice)जाते आणि आरोग्य बिघडते.आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यातील आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी कारल्याच्या रस तयार करण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने कारल्याचा रस तयार केल्यास कडू लागणार नाही.

हिवाळ्यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल इत्यादी आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होते. हे आजार होऊन नये म्हणून आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. कारल्याचा रस (juice)मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय फायदेशीर आहे. कारल्याच्या रसाचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. शिवाय पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया कारल्याचा रस बनवण्याची सोपी कृती:

साहित्य:

  • कारलं
  • लिंबाचा रस
  • काळ मीठ
  • पुदिन्याची पाने

कृती:

  • कारल्याचा रस बनवण्यासाठी सर्वप्रथम, कारली स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यांचे तुकडे करून कारल्यातील बी बाजूला काढा.
  • त्यानंतर कारल्यांमधील कडूपणा कमी होण्यासाठी 15 मिनिटं कारली खारट पाण्यात भिजत ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात पाण्यात ठेवलेली कारली, पुदिन्याची पाने टाकून मिक्सरमधून वाटून घ्या.
  • तयार केलेला रस गाळून घ्या आणि त्यात काळं मीठ, लिंबाचा रस मिक्स करा.
  • लिंबाच्या रसामुळे कारलं कडू लागणार नाही. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कारल्याचा रस.

हेही वाचा :

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण

मोठी बातमी! कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी

आज आयुष्मान योगासह बनले अनेक शुभ योग; 5 राशींना लाभणार लक्ष्मीची कृपा