सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा हेल्दी रताळ्याचे चाट, शरीराला होतील अनेक फायदे

सकाळच्या नाश्त्यात(breakfast) नेहमी नेहमी काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. तर काहींच्या घरी सतत कांदापोहे, शिरा, उपमा, इडली, डोसा इत्यादी पदार्थ बनवले जातात. पण सतत तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही आरोग्यदायी आणि पौष्टिक पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते.

अशावेळी तुम्ही (breakfast)रताळ्याचा चाट बनवून खाऊ शकता. रताळ्याच चाट चवीला अतिशय सुंदर लागत. शिवाय दैनंदिन आहारात रताळं खाल्यास शरीराला पोषण मिळेल आणि आरोग्याला सुद्धा फायदे होतील. सकाळच्या वेळी पौष्टिक आणि पोटभर नाश्ता केल्यामुळे आरोग्याला फायदे होतात, मात्र संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया रताळ्याचे चविष्ट चाट बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
उकडवून घेतलेलं रताळं
चाट मसाला
मीठ
लिंबाचा रस
हिरवी मिरची
डाळिंबाचे दाणे
दही
भाजलेल्या जिऱ्याची पावडर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
कृती:
रताळ्याचे चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, रताळी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये पाणी टाकून रताळी शिजवा.
मोठ्या बाऊलमध्ये साल काढून बारीक चिरून घेतलेली रताळी, चाट मसाला, काळे मीठ, लिंबाचा रस आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकून मिक्स करून घ्या. नंतर त्यावर लिंबाचा रस टाका.
सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यात दही आणि बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून मिक्स करा.
सगळ्यात शेवटी डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले रताळ्याचे चाट. तुम्ही बनवलेला हा पदार्थ सगळ्यांना नक्की आवडेल.
हेही वाचा :
नववर्षात सलमानची आठवण! ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला खास जुना फोटो!
‘माझा निर्णय योग्य होता! मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मिस करत नाही’ MS Dhoni निवृत्तीवर काय म्हणाला ?
बनावट कंपन्या स्थापन करून बुडविला तब्बल ४९६ कोटींचा जीएसटी