त्वचा, दृष्टी सुधारण्यास आंबा फळ आरोग्यदायी

गोड, चवदार व विविध प्रकारानुसार आकर्षक रंग असलेला फळांचा राजा आंबा(healthy) हा आबालवृद्धांसह सर्वांच्याच पसंतीचे फळ आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांत त्याचा आमरस करून आस्वाद घेतला जातो. आंबा फळाचे आरोग्यदायी फायदे आहेत.

ताजा आणि चांगला आंबा खाण्याने त्वचा, दृष्टी, पचनक्रिया सुधारणे. परंतु, बाजारात बंद(healthy) बाटली व पाकीटामध्ये मिळणाऱ्या आमरसमध्ये शरीराला उपयुक्त घटक नसतात. ताज्या आंब्याचे मूल्य आणि त्यातून मिळणारे फायदे ओळखणे महत्त्वाचे असल्याचे तज्ञाकडून सांगण्यात येते.

डोळ्यांसाठी आंबे फायदेशीर
आंब्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. निरोगी दृष्टीस समर्थन देण्यासाठी पुरेसे व्हिटॅमिन ए तयार करण्यास मदत करते आणि मॅक्युलर डिजेनेरेशन आणि दृष्टी कमी होणे यासारख्या डोळ्यांच्या आजारांपासून संरक्षण करते.

प्रथिनांचे सहज विघटन होण्यास मदत
आंब्यामध्ये असलेल्या आहारातील फायबरमुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. आंब्यातील एन्झाईम्स प्रथिनांचे सहज विघटन होण्यास मदत करतात. आतड्यात फायदेशीर बॅक्टेरियाच्या वाढीस प्रोत्साहन देऊन, आंबा खाण्यातून ऊर्जा पातळी सुधारते.

त्वचेचे सुधारते आरोग्य
आंब्याचे आतडे आणि एकूणच आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि बीटा कॅरोलिन यांसारख्या अँटीऑक्सिडंट्सचे उच्च प्रमाण नियमित सेवनाने त्वचेची चमक वाढवू शकते. आहारात आंब्याचा समावेश करून त्वचेची नैसर्गिक चमक वाढवता येते.

शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत
आंब्यामध्ये असलेल्या पॉलिफेनॉलमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात आणि ते शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करतात, ऑक्सिडेटिव्ह तणाव ही एक हानिकारक प्रक्रिया आहे. जी शरीरात अँटिऑक्सिडंट्स आणि मुक्त रॅडिकल्समध्ये असंतुलन असताना उद्भवते. जेव्हा मुक्त रॅडिकल्सची संख्या औटऑक्सिडंट्सपेक्षा जास्त असते, तेव्हा ते निरोगी पेशींवर हल्ला करू शकतात, ज्याचा विविध प्रकारच्या कर्करोगाशी संबंध आहे.

हेही वाचा :

सांगली;तीन वाहनांच्या विचित्र अपघातात मुलाचा अंत

बारावी नापासांसाठी पर्याय; ऋषभ ‘असा’ बनला करोडपती

उड्डाण घेताच एअर इंडियाच्या विमानाला आग;