हिवाळ्यात फायदेशीर ठरतील मिश्र धान्याचे लाडू; जाणून घ्या सोपी Recipe

हिवाळा आला कि अनके खाण्यापिण्याच्या गोष्टी बाजारात येतात. या सिजनमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ बनवले जातात. हिवाळ्यात आपण जेवढे हेल्दी पदार्थ(food) खाऊ तेवढे ते आपल्या शरीराला फायदेशीर ठरते. या काळात जेवढे गरम पदार्थ खाऊ तेवढे ते आपल्या शरीराला आतून छान ऊर्जा आणि गर्मी देते.

हे सगळे पदार्थ(food) एक प्रकारचे शरीराला वंगण करतात. नुकतीच मकर संक्रात झाली. त्यावेळी तुम्ही तिळगुळाचे लाडू खाल्ले असतील. हे लाडू खाऊन आता तुम्ही कंटाळे असाल. याचमुळे आम्ही तुमच्यासाठी गोदरेज विक्रोळी कुकिना मिलेट्स कुक बुकचे लेखक शेफ वरूण इनामदार यांची एक खास मिश्र लाडूची रेसिपी घेऊन आलो आहोत.

लागणारे साहित्य

  • 50 ग्रॅम बाजरीच्या भाजलेल्या लाह्या
  • 50 नाचणीच्या भाजलेल्या लाह्या
  • 50 ग्रॅम मिश्र धान्याचे पीठ, तुमच्या आवडीची कोणतीही सहा पीठे 
  • 20 ग्रॅम भोपळ्याच्या बिया
  • 20 ग्रॅम भाजलेले तीळ
  • 20 ग्रॅम जवस 
  • 50 ग्रॅम खजूर, बिया काढून, तुकडे केलेला
  • 50 ग्रॅम बदामाचे काप 

कसे बनवायचे लाडू?

  • पॅनमध्ये तूप घाला. त्यात खजुराचे तुकडे घालून ते मऊसर होईपर्यंत परता. 
  • गुळाची पावडर आणि पाव कप पाणी घाला. सहा मिनिटं उकळवून त्याचा दाट पाक करून घ्या. गॅस बंद करा. 
  • एकापाठोपाठ एक साहित्य घालून गुळाच्या पाकात चांगले मिसळून घ्या.
  • हे मिश्रण तुप लावलेल्या ताटलीत किंवा ट्रे मध्ये काढा, म्हणजे ते सेट होईल. 
  • मिश्रणाचे गोलाकार आकाराचे लाडू वळा. 
  • प्रत्येक लाडू बटर पेपरमध्ये व नंतर अल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळा. यामुळे ते चांगले राहतील. 
  • हे शक्तीवर्धक लाडू रोज एक खा. 

हेही वाचा :

अखेर उद्या Hyundai Creta Electric होणार लाँच

रोहित शर्मा होपलेस.., हिटमॅन आऊट ऑफ फॉर्म; 88 वर्षांच्या आजीबाई भडकल्या-VIDEO

श्रद्धा कपूर बनणार ‘नागिन’, चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट