खूर्चीवर बसून मोहम्मद शमी करतोय T20 वर्ल्ड कपची तयारी; पाहा Video

वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची(world cup ball) स्पर्धा 1 जूनपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा 29 जूनपर्यंत खेळवली जाणार आहे. यंदाच्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमधील प्रमुख दावेदार असलेली टीम इंडिया 5 जूनपासून आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.

तर 9 जून रोजी भारताचा सामना (world cup ball)कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होईल. त्यामुळे आता टीम इंडिया जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता टीम इंडियाच्या गोलंदाजीचं प्रमुख अस्त्र म्हणजे मोहम्मद शमी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या तयारीला लागला आहे.

मोहम्मद शमी वनडे वर्ल्ड कपनंतर टीम इंडियातून दुखापतीमुळे बाहेर पडला. शमीच्या भेदक गोलंदाजीमुळे टीम इंडियाला वनडे वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत जाता आलं. मात्र, घोट्याच्या दुखापतीमुळे मोहम्मद शमी गेल्या दोन महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. त्यानंतर लंडनमध्ये शमीवर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्यानंतर शमी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नाही, असं म्हटलं जात होतं. अशातच आता मोहम्मद शमीने हार मानली नाही. मोहम्मद शमी दुखापग्रस्त असताना देखील वर्ल्ड कपची तयारी करत आहे. त्याचा व्हिडीओ शमीने शेअर केला आहे.

जेव्हा 1.3 अब्ज लोकांच्या विश्वासाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर असते तेव्हा कठोर परिश्रम हा केवळ पर्याय नसून गरज बनतो, असं मोहम्मद शमी म्हणतो. त्यामुळे पुढे जात राहा, कधीही काम करणं थांबवू नका, असा सल्ला मोहम्मद शमीने युवा खेळाडूंना दिला आहे. मोहम्मद शमी काळी कुर्ती घालून खूर्चीवर बसलेला दिसतोय. खुर्चीवर बसून मोहम्मद शमी बॉलिंगची प्रॅक्टिस करत आहे. काही प्रमाणात शमीला उभं देखील राहता येतंय. धावत बॉलिंग करता येत नसली तरी शमीची लाईन आणि लेंथ बिघडलेली दिसत नाहीये.

दरम्यान, या महिन्याच्या अखेरीस टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचं सिलेक्शन होणार आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, रिंकू सिंह, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत या 8 खेळाडूंची नावं निश्चित झाल्याची माहिती आहे. विराट कोहलीच्या खेळण्यावरून अजूनही संभ्रम असल्याची माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली आहे. आता मोहम्मद शमी, शिवम दुबे आणि शुभमन गिल या नावावर चर्चा सुरू असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

हेही वाचा :

 “कर्ज फेडण्यासाठी करावं लागतं…”, प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्रालयात भीषण आग; कॉम्प्युटर, कागदपत्रे जळून खाक

“रवी किशन माझे पती”; निवडणुकीपूर्वी भाजप खासदार वादाच्या भोवऱ्यात; मुलगीही आली समोर