सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिस नेहमीच एक विश्वासार्ह माध्यम ठरले आहे.(scheme)रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात केल्याने अनेक बँकांनी मुदत ठेवींचे व्याजदर कमी केले आहेत. अशा परिस्थितीत, पोस्ट ऑफिसची पब्लिक प्रॉव्हिडंट फंड योजना एक आकर्षक आणि सुरक्षित पर्याय म्हणून समोर येत आहे.पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी १५ वर्षांच्या मुदतीची बचत योजना आहे. या योजनेत सध्या वार्षिक ७.१०% दराने व्याज मिळत आहे. ही योजना पोस्ट ऑफिससोबतच निवडक बँकांमध्येही उपलब्ध आहे. पीपीएफ योजनेतील गुंतवणुकीला सरकारची हमी असल्याने ती पूर्णपणे जोखिमुक्त आहे.

या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची ‘EEE’ कर सवलत स्थिती. याचा अर्थ, तुम्ही गुंतवलेली रक्कम, त्यावर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मिळणारी संपूर्ण रक्कम पूर्णपणे करमुक्त असते. (scheme)त्यामुळे, कर बचत करू इच्छिणाऱ्यांसाठी आणि दीर्घकालीन आर्थिक ध्येय साध्य करू पाहणाऱ्यांसाठी पीपीएफ हा एक उत्तम पर्याय आहे. या योजनेत तुम्ही वार्षिक किमान ५०० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.

पीपीएफ योजनेत नियमित गुंतवणूक करून तुम्ही १५ वर्षांत एक मोठा निधी उभारू शकता. समजा, तुम्ही या योजनेत दरमहा १२,५०० रुपये, म्हणजेच वार्षिक १.५ लाख रुपये कमाल मर्यादा गुंतवले. ७.१०% च्या सध्याच्या व्याजदरानुसार, १५ वर्षांनंतर तुमच्या खात्यात अंदाजे ४० लाख ६८ हजार २०९ रुपये जमा होतील.(scheme)या १५ वर्षांच्या कालावधीत तुमची एकूण गुंतवणूक २२ लाख ५० हजार रुपये असेल, तर त्यावर तुम्हाला तब्बल १८ लाख १८ हजार २०९ रुपये व्याज म्हणून मिळतील. दीर्घ मुदतीत सुरक्षितपणे मोठी रक्कम जमा करण्यासाठी पीपीएफ हा एक खात्रीशीर मार्ग आहे.
हेही वाचा :
आता तुमच्या मुलाचंही पीएफ खातं उघडता येणार; जाणून घ्या योजना…
ऐन दिवाळीत आगीत होरपळली ‘ही’ अभिनेत्री, वडिलांनी वाचवले प्राण…
तुझी की माझी? सेलमध्ये एका साडीवरुन दोन महिलांमध्ये जोरदार भांडण ; एकमेकींचे केस धरले अन्…, VIDEO तुफान व्हायरलEdit