महिनाभरात पैसे झाले दुप्पट; 6 रुपयांच्या या शेअरने गुंतवणुकदारांना केले मालामाल!
गेल्या दोन दिवसांपासून शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. या घसरणीनंतरही काही शेअर्स गुंतवणूकदारांना(investors) मालामाल करत आहेत. शेअर बाजार घसरला असला तरी, अनेक गुंतवणूकदारांचा त्यावरील विश्वास कायम आहे. यामुळेच बाजार घसरल्यानंतरही बहुतांश गुंतवणूकदार शेअर्सची विक्री करत नाहीत.
त्याऐवजी ते मोठ्या आणि मजबूत कंपन्यांमध्ये अधिक गुंतवणूक(investors) करत आहेत. कदाचित त्यामुळेच मंगळवारी (ता.१) अनेक समभागांनी अप्पर सर्किट गाठले आहे. गुंतवणूकदारांना श्रीमंत बनवणाऱ्यांमध्ये अनेक पेनी स्टॉक्सचाही समावेश आहे.
गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देणाऱ्या पेनी स्टॉकमध्ये जेएमजी कॉर्पोरेशन लिमिटेडचे शेअर्स देखील समाविष्ट आहेत. 6 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या या शेअरने गुंतवणूकदारांना मोठा परतावा दिला आहे. सध्या त्याच्या शेअरची किंमत 5.80 रुपये इतकी आहे. या शेअरने एका महिन्यात गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. एका महिन्यात त्याचा परतावा सुमारे 108 टक्के इतका आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यात दोन टक्के अप्पर सर्किट आहे.
त्यामुळे आता जर तुम्ही महिन्याभरापूर्वी या कंपनीत 1 लाख रुपये गुंतवले असते. तर आज तुमच्या त्या एक लाखाची किंमत 2.08 लाख रुपये झाली असती. म्हणजेच एका महिन्याच्या आत तुम्हाला 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 1 लाखांपेक्षा जास्त नफा झाला असता. त्यामुळे हा शेअर महिनाभरापासून गुंतवणूकदारांसाठी पेनी स्टॉक ठरत आहे.
या शेअरने एका वर्षातही गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. एका वर्षात त्याचा परतावा 200 टक्क्यांपेक्षा थोडा जास्त आहे. म्हणजे गुंतवलेली रक्कम एका वर्षात तिप्पट झाली आहे. वर्षभरापूर्वी त्याच्या शेअरची किंमत 1.92 रुपये होती. जर तुम्ही वर्षभरापूर्वी 1 लाख रुपयांचे शेअर्स खरेदी करून या कंपनीत गुंतवणूक केली असती तर आज त्या 1 लाख रुपयांचे मूल्य 3 लाख रुपये झाले असते. म्हणजे 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर एका वर्षात 2 लाख रुपयांचा नफा मिळाला असता.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
किमान 3 दिवस रुग्णालयातच राहणार रजनीकांत
iPhone 16 वर रिलायन्सकडून बंपर ऑफर; मिळणार तब्बल ‘इतक्या’ हजारांचं डिस्काऊंट
राज्य सरकार लाडक्या बहिणींना विकत घेणार का?; काँग्रेसच्या महिला खासदाराचा थेट सवाल
iPhone 16 वर रिलायन्सकडून बंपर ऑफर; मिळणार तब्बल ‘इतक्या’ हजारांचं डिस्काऊंट