न्यू इयर सेलिब्रेशननंतर धापकन पडली मौनी रॉय, पार्टीतून बाहेर आल्यानंतरचा Video Viral

जगभरात नवीन वर्षाचे स्वागत केले जात आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही पार्टीचे आयोजन केले होते आणि या बीटाऊन पार्ट्यांचे व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल (video viral)होत आहेत. असाच एक व्हिडिओ अभिनेत्री मौनी रॉयचाही समोर आला असून, यामध्ये ती चालता चालता जमिनीवर पडल्याचे कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मौनीने तिचा नवरा सूरज नांबियार आणि बेस्ट फ्रेंड दिशा पाटनी यांच्यासोबत नववर्षाचे सेलिब्रेशन केले, त्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. मौनीचा व्हिडिओ(video viral) समोर आल्यानंतर चाहत्यांनी तिच्याविषयी चिंता व्यक्त केली, तर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये मौनी, सूरज आणि दिशा एका पार्टीमधून बाहेर पडताना दिसत आहे. त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पापाराझींनी घेराव घातला होता, तेव्हा पायऱ्या उतरताना अचानक मौनीचा पाय घसरला आणि ती पडली. सूरज आणि दिशाने तिला तातडीने सावरले आणि गाडीच्या दिशेने नेले. यानंतर मौनीच्या चेहऱ्यावर दुखापतीच्या वेदना स्पष्ट दिसत होत्या.

मौनीचा असा व्हिडिओ समोर आल्यानंतर काहींनी तिला दुखापत तर झाली नाही ना, याविषयी विचारले. तर काही युजर्सनी तिची खिल्ली उडवली. एकाने लिहिले, ‘जर सांभाळू शकत नाही, तर एवढी पिता कशाला? अन्य एकाने म्हटले की, ‘पीके टाइट’. एका युजरने असे म्हटले की, ‘बरं झालं तिच्या नवऱ्याने जास्त प्यायली नाही, अन्यथा हिचे काय झाले असते?’ अनेकांनी असा अंदाज बांधला आहे की, ती दारुच्या नशेतच चालत होती आणि त्यामुळे तिची अशी अवस्था झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला.

चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, मौनी रॉय लवकरच ‘सलाकार’ सिनेमामध्ये दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन फारुख कबीर करत आहेत. याशिवाय ती अहमद खान दिग्दर्शित ‘वेलकम टू द जंगल’मध्ये दिसणार आहे. याशिवाय अभिनेत्री मोहित सूरीच्या ‘मलंग २’मध्येही दिसणार आहे.

हेही वाचा :

व्हॉट्सॲप आता ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार नाही, बघा तुमचा फोनही यादीत आहे का?

रील्ससाठी ट्रेनच्या सीट फाडण्याचा धक्कादायक प्रकार! VIDEO व्हायरल होताच नेटकरी संतापले म्हणाले…

अखेर जानेवारी 2025 मध्ये Hyundai Creta EV होणार लाँच, सोशल मीडियावर पहिला टिझर प्रदर्शित