मुकेश अंबानींना झटका अदानींचा फायदा अर्थसंकल्पाचा काय परिणाम झाला?
अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले. या(affected) अर्थसंकल्पाचा भारतातील अब्जाधिशांवरही परिणाम झाला. सेन्सेक्समधील लिस्टेट कंपन्यांमध्ये लार्सन एंड टुब्रो, बजाज फायनान्स, पॉवर ग्रिड, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फिनसर्व्ह या शेअरमध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. याचा परिणाम या कंपनीच्या गुंतणणूकदारासहित त्यांच्या मालकांवरही झाला. तर काही शेअरमध्ये उसळी पाहायला मिळाल्याने त्या कंपनीचे मालकही मालामाल झाले.
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सच्या ताज्या माहितीनुसार, टॉप-१० अब्जाधिशांच्या संपत्तीत मंगळवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. तर अर्थसंकल्पाच्या दिवशी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांना मोठा झटका बसला. आरआयएलच्या शेअरमध्ये घसरण झाल्याने त्यांची संपत्ती १.१० अब्ज डॉलरने कमी होऊन ११२ अब्ज डॉलर झाली.
उद्योजक अजीम प्रेम यांचंही नुकसान झालं. (affected)विप्रोच्या शेअरमध्ये घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे त्यांचं नेटवर्थ १२३ मिलियन डॉलरने कमी होऊन २८.४ अब्ज डॉलर झाली. तसेच कुमार बिडला यांनाही २०० मिलियन डॉलरचा झटका बसला. त्यांची एकूण संपत्ती आता २२.२ अब्ज डॉलर इतकी आहे.
बजेटनंतर काही अब्जाधिशांना फायदा
अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्या संपत्तीत मंगळवारी ७५१ मिलियन डॉलरने वाढ ढाली. त्यांचं नेटवर्थ १०२ अब्ज डॉलर इतकं झालं. शापूर मिस्त्री यांच्या संपत्तीत २१९ मिलियन डॉलरने वाढ झाली. त्यांचं नेटवर्थ ४०.५० अब्ज डॉलर इतकं झालं. शिव नादार यांच्या संपत्तीत ४०९ मिलियन डॉलरने वाढ झाली. त्यांचं नेटवर्थ आता ३७.२ अब्ज डॉलर झालं आहे.
जेएसडब्लू स्टीलचे मालक सावित्री जिंदल यांच्या संपत्तीत १०.५ मिलियन डॉलरने वाढ ढाली. त्यांचं नेटवर्थ ३३.७ इतकं झालं. दिलीप सांघवी यांच्या संपत्तीत २६४ मिलियन डॉलरने वाढ झाली. त्यामुळे त्यांचं नेटवर्थ ३३.७ अब्ज डॉलर इतकं झालं. राधाकृष्ण दमानी यांनाही २३४ मिलियन डॉलरचा फायदा झाला. त्यामुळे त्यांची संपत्ती २४ अब्ज डॉलर इतकी झाली. तर सुनील मित्तल यांच्या संपत्तीत ४ मिलियन डॉलरने वाढून २३.२ अब्ज (affected)डॉलर झाली.
हेही वाचा :
पावसाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल? हे हेअर मास्क ठरतील फायदेशीर;
कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प
चिपळूणमध्ये बनावट नोटा छापण्याचे रॅकेट उद्ध्वस्त, चौघे अटकेत
अर्थसंकल्पावरून ठाकरे गटाची मोदी सरकारवर टीका!