मुकेश अंबानींचा नवा डाव… Jio कडून मिळणार मोफत वायफाय
जिओने देशभरातील ग्राहकांसाठी मोठी ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत कंपनी(jio wifi) देशभरात मोफत वायफाय बसवणार आहे. त्यामुळे आता तुम्ही हे ऐकून नक्कीच विचारात पडला असाल की असे कंपनी नेमके का करत आहे? तर कंपनीने मोफत वायफाय बसवण्यासाठी योजना आणली आहे. त्यामुळे आता तुम्हीही आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये वायफाय बसवण्याचा विचार करत असाल, तर जिओच्या या योजनेसाठी अप्लाय करू शकतात.
BSNL या सरकारी दूरसंचार कंपनीने देखील अशीच काहीशी योजना (jio wifi)ग्राहकांसाठी आणली होती. ज्याअंतर्गत कंपनीकडून ‘फ्री वायफाय इंस्टॉलेशन’चा ऑप्शन देण्यात आला होता. त्यानंतर आता जिओ कंपनीकडून स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘ही’ सुविधा दिली जाणार आहे. तुम्हाला या योजनेअंतर्गत आपल्या घरात किंवा कार्यालयात वायफाय बसवायचे असल्यास, तुम्हाला त्यासाठी कोणताही खर्च येणार नाही.
जिओकडून आपल्या या ऑफरला ‘जिओ फ्रीडम ऑफर’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र, त्यासाठी ग्राहकांना जिओ कंपनीचा तीन महिन्यांचा वायफायचा रिचार्ज करावा लागणार आहे. अर्थात 2121 रुपयांचा इंटरनेट प्लॅन खरेदी केल्यानंतर ग्राहकांना ही मोफत वायफाय सेवा दिली जाते.
यापूर्वी या प्लॅनसोबत ग्राहकांना वायफाय बसवण्यासाठी १ हजार रुपये चार्ज अतिरिक्त द्यावा लागत होता. या योजनेमुळे तो आता द्यावा लागणार नाहीये. अर्थात वायफाय बसवण्यासाठी कंपनीकडून ३० टक्के सवलत दिली जात आहे.
दरम्यान, आता मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स जिओच्या ऑफरमुळे BSNL, Airtel, आणि Vi या आघाडीच्या दूरसंचार कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे. अगदी याच पद्धतीने बीएसएनएलकडून ग्राहकांना सुविधा दिली जात होती. त्यातच आता जिओने ही सुविधा देणे सुरू केल्याने, ग्राहकांसाठी ही मोठी ऑफर ठरणार आहे.
हेही वाचा :
धक्कादायक! मुलाला जमिनीत गाडून आई-बहिण मागतायत लाईक्स-फॉलोअर्स…Video
कुत्रे भुंकू लागल्याने सिंह झाडीत गेले, मालक गेट उघडून बाहेर आला अन्…; VIDEO व्हायरल
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का, दोन आमदार शिंदे गटाच्या वाटेवर?