मुंबई पोलिसांचे निवडणूक आचारसंहिता काळात मोठ्या कारवाया,
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता मुंबई पोलिसांकडून 3 व 4 मे रोजी All Out Oprection अंतर्गत विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत पोलिसांनी मुंबई शहर व परिसरातील गुन्हेगारीवर कारवाया करण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डवरील 8 पाहिजे /फरारी आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर, एकूण 53 अजामीनपात्र वॉरंट ची बजावणी करून आरोपींवर कारवाई करण्यात आली. देशात आचारसंहिता असल्याने सर्वत्र पोलिसांचा अलर्ट मोड असून महाराष्ट्रातही निवडणुका सुरू असल्याने पोलीस कारवाई मोठ्या प्रमाणात सुरू आहे. निवडणूक काळात होत असलेल्या चुकीच्या कृत्यांवर पोलीस लक्ष ठेऊन आहेत.
पोलिसांकडून विविध गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करण्यात आली असून अंमली पदार्थ खरेदी/विक्री करणाऱ्या इसमांवर अंमलीपदार्थ विरोधी कायदा अन्वये एकुण 5 कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच, अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकुण 49 कारवाया करण्यात आल्या असून त्यात चाकू, तलवारी इ. शस्त्रे जप्त करण्यात आली. अवैध अग्निशस्त्र हत्यारे, बंदूक जप्तीच्या एकुण 2 कारवाया करण्यात आलेल्या आहेत. या विशेष मोहित कारवाईंतर्गत 2 अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली असून 2 आरोपींस अटक करण्यात आली आहे.
अवैध दारू विक्री / जुगार इ. अवैध धंदयांवर 24 ठिकाणी छापे टाकून अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले. त्यादरम्यान 30 आरोपींस अटक करण्यात आली. मुंबई शहराबाहेर तडीपार केलेले, परंतु मुंबई शहरात विना परवाना प्रवेश केलेल्या तडीपार आरोपींना अटक करण्याचे अनुषंगाने एकुण 62 कारवाया करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम 120,122,135,142अन्वये संशयितरित्या वावरणारे इसमांवर एकुण 175 कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे अनधिकृत फेरीवाल्यांवर एकुण 154 कारवाया करण्यात आल्या आहेत. तर, बृहन्मुंबई शहरात एकुण 206 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले, त्यामध्ये अभिलेखावरील 964 आरोपी (रेकॉर्डवरील) तपासण्यात आले. त्यामध्ये 230 आरोपी मिळून आले. त्यांचेवर गुणवत्तेप्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. येथील सर्व पोलीस ठाण्याचे हद्दीत एकुण 111 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती.
पोलीस नाकाबंदीतील कारवाई
1) त्यामध्ये एकुण 7233 दुचाकी / चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.
2) मोटार वाहन कायद्यान्वये 2440 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
3) कलम 185 मोवाका अन्वये 77 वाहन चालकांवर Drunk & Drive ची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने एकुण 800 हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणीही करण्यात आली आहे. तसेच, निवडणुकांची आचारसंहिता अद्यापही सुरू असल्याने पोलिसांकडून कारवाई सुरुच आहे.