‘माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे’, दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज

नवी दिल्ली- इस्राइल आणि हमासमध्ये अद्याप संघर्ष सुरु आहे. यातच इस्राइलच्या एका तरुणीने(ring) तिची आपबीती सांगितली आहे. ती म्हणाली की, एक हमासचा अतिरेकी तिच्याशी लग्न करण्यास इच्छुक होता. टाईम्स ऑफ इस्त्राइलनुसार, १८ वर्षीय नोगा वीस मागील वर्षी तब्बल ५० दिवस हमासच्या कैदेमध्ये होती.

नोगा वीस हिने अनेक खुलासे केले आहेत. नोगाने दावा केलाय की, एका अतिरेक्याने तिला अंगठी(ring) देऊन प्रपोज केलं होतं. अतेरिकी तिच्याशी लग्न करण्यासाठी इच्छुक होता. त्याने तिच्या आईची देखील नोगासोबत भेट घातली होती. तो नोगाला म्हणायचा की, ती आता कायमस्वरुपी गाझामध्येच राहणार आहे. त्यामुळे तिने त्याच्या मुलांना जन्म द्यावा.

मला कैदेत ठेवून १४ दिवस झाले होते. त्यानंतर एक दहशतवादी माझ्याकडे आला अन् त्याने मला अंगठी दिली. सगळ्यांना मुक्त केलं जाईल. पण, तुला सोडलं जाणार नाही. तुला माझ्यासोबत इथेच राहायचं आहे. माझ्या मुलांना जन्म द्यायचं आहे असं दहशतवादी म्हणाल्याचं नोगा वीस म्हणाली. नोगाने ‘द टाईम्स ऑफ इस्राइल’ला मुलाखत दिली होती. यात तिने हा खुलासा केला आहे.

नोगाने या प्रपोजला काय उत्तर दिलं असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली की, मी हसण्याचं नाटक केलं कारण मला भीती होती की तो माझ्या डोक्यात गोळी मारेल. नोगाने सांगितलं की, सुरुवातीला ती शांतमध्ये त्याचं प्रपोजल धुडकावू पाहात होती. पण, तो हट्ट करत राहिला. त्यानंतर मात्र ती त्याच्यावर ओरडली. इस्राइल आणि हमासमध्ये झालेल्या कराराअंतर्गत नोगाला मु्क्त करण्यात आलं होतं.

हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोंबरला इस्राइलवर हल्ला केला होता. नोगाचे कुटुंब गाझा पट्टीच्या जवळच्या भागात राहात होते. जेव्हा हल्ला झाला तेव्हा नोगाचे वडील एमरजेन्सी स्क्वाडमध्ये भरती होण्यासाठी गेले होते. पण, ते परत आले नाहीत. गाझामधून त्यांचे पार्थिव परत आणण्यात आले. अतिरेक्यांनी नोगाच्या घरावर हल्ला केला. तेव्हा तिच्या आईने नोगाला लपवण्याचा प्रयत्न केला. पण, शेवटी ती अतिरेक्यांच्या हाती लागली. तिला गाझामध्ये नेण्यात आलं होतं.

नोगाने सांगितलं की, ४० दहशतवाद्यांनी माझे अपहरण केले होते. माझे हात-पाय बांधण्यात आले होते. त्यांनी मला एका कारमध्ये घातलं अन् गाझामध्ये नेलं. मला वेगवेगळ्या घरात ठेवण्यात आलं. त्यांनी मला हिजाब घालण्यासाठी बळजबरी केली.

हेही वाचा :

आज संकष्टी चतुर्थीला चुकूनही खाऊ नका ‘हे’ पाच पदार्थ, अन्यथा…

iPhone 13 वर मिळत आहे जबरदस्त ऑफर, 128GB मॉडेल स्वस्तात खरेदी करण्याची संधी

‘मी वावरात आहे, पाकीट घरी विसरलोय, 600 रूपये पाठव…’ धोनीचा मेसेज आला असेल तर सावधान!