दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री समंथा रुथ प्रभू तिच्या प्रोफेशनल आयुष्याप्रमाणेच पर्सनल (finally )आयुष्यामुळेही नेहमीच चर्चेत असते. तिच्या लव्हस्टोरीपासून ते ब्रेकअप आणि घटस्फोटापर्यंत, प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. आता पुन्हा एकदा समंथा तिच्या एका टॅटूमध्ये चर्चेत आली आहे, पण यावेळी तिने तो काढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.समंथा आणि अभिनेता नागा चैतन्य यांची लव्हस्टोरी ‘ये माया चेसवे’ या चित्रपटातून सुरू झाली होती. २०१० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानंतर ते दोघे फक्त सहकलाकार राहिले नाहीत, तर त्यांची मैत्री प्रेमात बदलली.
साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांची जोडी प्रचंड गाजली. २०१७ मध्ये त्यांनी मोठ्या थाटामाटात हिंदू आणि ख्रिश्चन अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले. मात्र, अवघ्या चार वर्षांतच, म्हणजेच २०२१ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि त्यांचे मार्ग वेगळे झाले. नागा चैतन्यने गेल्या वर्षी अभिनेत्री शोभिता धुलीपाळासोबत लग्न केले असून, (finally )समंथाचे नाव सध्या ‘द फॅमिली मॅन’चे दिग्दर्शक राज निदीमोरु यांच्याशी जोडले जात आहे.
नागा चैतन्यसोबतच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून समंथाने शरीरावर तीन टॅटू गोंदवून घेतले होते. त्यापैकी एक टॅटू तिच्या मानेवर ‘YMC’ असा होता. हा टॅटू तिने त्यांच्या पहिल्या चित्रपटासाठी, ‘ये माया चेसवे’साठी काढला होता, कारण याच चित्रपटाने त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात केली होती. पण आता घटस्फोटानंतर चार वर्षांनी समंथाने हा टॅटू काढून टाकला असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
अलीकडेच समंथाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती बरगंडी रंगाचा बॅकलेस ड्रेस घालून एका पारदर्शक काचेवर काहीतरी लिहिताना दिसत आहे. मात्र, व्हिडिओमध्ये तिच्या मानेवरील ‘YMC’ टॅटू दिसत नसल्याने तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. (finally )अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत याबद्दल प्रश्न विचारले आहेत. एका युजरने “समंथाने आपला YMC टॅटू काढून टाकलाय,” असे म्हटले आहे, तर दुसऱ्याने “हा टॅटू फाउंडेशनने झाकलेला असावा, कारण हे फक्त अॅडसाठी आहे,” अशी शक्यता वर्तवली आहे.
नागा चैतन्यने आता शोभिता धुलिपालाशी लग्न केले असल्याने, समंथाचे नाव सध्या दिग्दर्शक राज निदीमोरु यांच्याशी जोडले जात आहे. ते दोघे अनेकदा एकत्र दिसले आहेत. अलीकडील रिपोर्टनुसार, समंथा आणि राज एकत्र राहण्याची योजना करत आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने सांगितले आहे की, “ते सध्या एक फ्लॅट शोधत आहेत… राजने २०२२ मध्ये श्यामलीपासून अधिकृतपणे घटस्फोट घेतला आणि ‘सिटाडेल’ चित्रपटादरम्यान समंथाच्या प्रेमात पडला.” समंथाने खरंच टॅटू काढला आहे की नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण तिच्या चाहत्यांसाठी हा नक्कीच एक कुतूहलाचा विषय बनला आहे.
हेही वाचा :