प्रियांका चोप्रा, राधिका आपटे कपडे काढून सिनेमात दिसतात ते कसं चालतं? अभिनेत्रीचे खडे सवाल

‘हाऊस अरेस्ट’चा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एजाज खानचा शो उल्लू अॅपवरून काढून टाकण्यात आला आहे. आता या प्रकरणी एजाज खानवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. अशातच आता ‘हाऊस अरेस्ट’ची स्पर्धक गहना वशिष्ठनं यावर संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, ‘हाऊस अरेस्ट’बाबत सकारात्मक प्रतिक्रिया देत, तिनं प्रियांका चोप्राला यामध्ये ओढलं आहे. प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) हॉलिवूडमध्ये जाऊन कपडे काढते तेव्हा अश्लीलता पसरत नाही का? असा सवाल तिनं विचारला आहे. गहनाच्या प्रतिक्रियेनंतर इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे.

अलीकडेच उल्लू अॅपच्या ‘हाऊस अरेस्ट’ या रिअॅलिटी शोची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि खळबळ माजली. यामध्ये, शोचा होस्ट एजाज खान स्पर्धकांना कामसूत्रातील पोझिशन्स करायला लावताना दिसला आणि त्यांना हे पोझिशन्स सर्वांना शिकवायलाही सांगितलं. स्पर्धक गहना वशिष्ठही या एपिसोडमध्ये होती. गहानानं को-कंटेस्टेंटसोबत कामसूत्र पोझिशन्स देखील करुन दाखवल्या होत्या.

‘हाऊस अरेस्ट’चा आक्षेपार्ह व्हिडीओ पाहून लोक खूप संतापले आणि त्यांनी शोवर बंदी घालण्याची मागणी केली. राष्ट्रीय महिला आयोगानं उल्लू अॅपचे सीईओ विभू अग्रवाल आणि एजाज खान यांनाही समन्स पाठवलं आणि त्यांना 9 मे रोजी हजर राहण्यास सांगितलं. तसेच, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही या शोवर टीका केली आणि त्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली. या सगळ्यात आता गेहना वशिष्ठच्या खळबळ उडाली आहे.

ट्विटरवर गहना वशिष्ठचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती म्हणत आहे की, “सध्याचा करंट टॉपिक ट्विटरवर ट्रेंड करत आहे… आणि मला खूप लोकांचे फोन येत आहेत आणि ते म्हणतायत की ‘हाऊस अरेस्ट’ अश्लीलता पसरवतंय. ‘हाऊस अरेस्ट’वर बंदी घातली पाहिजे. मला एक गोष्ट सांगा… इतक्या अडल्ट वेबसाईट्स आहेत… तुम्ही लोक रात्रंदिवस अडल्ट गोष्टी पाहता, मग त्या अश्लीलता पसरवत नाहीत का? त्याच्यावर कारवाई का केली जात नाही?

गहना पुढे म्हणाली की, “जेव्हा प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra) हॉलिवूडमध्ये जाऊन तिचे कपडे काढते किंवा राधिका आपटे ‘सेक्रेड गेम्स’मध्ये टॉपलेस सीन देते… जेव्हा मंदाकिनीजींनी अनेक वर्षांपूर्वी असे सीन केले होते, तेव्हा तुम्हाला वाटत नाही का की, समाजात अश्लीलता पसरवली जात आहे?” जर नेटफ्लिक्स ते दाखवत असेल तर ते बरोबर आहे. जर हॉलिवूड आपल्या भारतीय मुलींची नग्न दृश्ये दाखवत असेल, तर ते बरोबर आहे. पण जर आपण लहान शहरांमधून येऊन स्वतःहून प्रयत्न केला, तर आपण अश्लीलता पसरवत आहोत. व्वा, काय ढोंगीपणा आहे.”

गहाना वशिष्ठनं असंही म्हटलंय की, “हाऊस अरेस्ट’मध्ये सहभागी होण्यासाठी आणि कपडे काढण्यासाठी तिच्यावर कोणत्याही प्रकारे दबाव आणला गेला नाही. ती स्वतःच्या इच्छेनं या शोचा भाग बनली आणि ती पूर्णपणे कंफर्टेबल आहे. ती म्हणाली, “जर मी कंफर्टेबल असेल, सर्व स्पर्धक कंफर्टेबल आहेत. प्रत्येकाचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि प्रत्येकजण स्वतःच्या मर्जीनं शो करत आहे, मग यात एजाज खान आणि उल्लू अॅप कुठून आलं? त्यांनी आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिला आहे, आम्ही शोमधील साऱ्या अॅक्टिव्हिटी करत आहोत. आम्हाला कोणीही जबरदस्ती करत नाहीये.”

गहानानं पुढे बोलताना असं म्हटलंय की, “ते इंटिमेट योगा पोझिशन्स करत आहेत आणि लोकांनी तो फक्त एक रिअॅलिटी शो म्हणून पाहावा. ती म्हणाली, “आम्ही योगासन करत आहोत.” तुम्ही खजुराहो आणि इतर अनेक ठिकाणी जाता… जिथे विचित्र योगासनं आहेत. तो फक्त एक शो आहे, एक रिअॅलिटी शो आहे. एखाद्या रिअॅलिटी शोसारखे घ्या ना? तुम्ही याला इन्फॉर्मेशन चॅनेलसारखं का समजण्याचा प्रयत्न का करत आहात?”

हेही वाचा :

राज्यात पुन्हा पावसाचे संकट; विदर्भात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा

आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींवर देवी लक्ष्मी होणार प्रसन्न, अचानक होणार धनलाभ

२३ वर्षीय शिक्षिका १३ वर्षाच्या मुलाला घेऊन पळाली, ५ महिन्यांची गर्भवती….