नवी Kia Seltos चा बाजारात धमाका; जाणून घ्या फीचर्स

किआ मोटर्सने भारतीय ऑटोमोबाइल बाजारात पुन्हा एकदा धमाका केला (automobile)आहे. कंपनीने त्यांची लोकप्रिय SUV, किआ सेल्टोसचे नवीन 2025 मॉडेल सादर केले आहे. नवीन सेल्टोसमध्ये आकर्षक किंमतीतील व्हेरिएंट्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे ही SUV आता अधिक ग्राहकांना परवडणारी झाली आहे. किआ सेल्टोसने जागतिक स्तरावर 6 लाख युनिट्स विक्रीचा विक्रम नोंदवल्यानंतर, भारतीय ग्राहकांसाठी हे नवीन अपडेट मॉडेल विशेष महत्त्वाचे ठरणार आहे.

किफायतशीर व्हेरिएंट्स आणि आकर्षक फीचर्स :
2025 किआ सेल्टोसमध्ये कंपनीने तीन नवीन व्हेरिएंट्ससादर केले आहेत, ज्यामध्ये ग्राहकांना विस्तृत पर्याय मिळतील. HTE हे बेस व्हेरिएंट असून त्याची एक्स-शोरूम किंमत 11.13 लाख रुपये आहे. त्यानंतर HTKव्हेरिएंट 12.99 लाख रुपयात, आणि HTK+ व्हेरिएंट 14.39 लाख रुपयात उपलब्ध असेल. या नवीन(automobile) व्हेरिएंट्समध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि आधुनिक स्मार्ट टेक्नोलॉजी यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, HTK हे व्हेरिएंट आता पॅनोरॅमिक सनरूफ फीचरमध्ये सर्वात स्वस्त पर्याय म्हणून समोर आले आहे, जे या सेगमेंटमधील ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरू शकते.
या नवीन बदलांमुळे किआ सेल्टोस आता अधिक विस्तृत ग्राहक वर्गापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. किंमत आणि फीचर्स यांचा योग्य मेळ साधल्यामुळे, भारतीय बाजारात ही SUV पुन्हा एकदा वर्चस्व गाजवण्याची शक्यता आहे. नवीन वर्षातील अपडेट्स आणि आकर्षक किंमतीमुळे ग्राहक या गाडीला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दमदार इंजिन आणि आधुनिक तंत्रज्ञान :
2025 किआ सेल्टोसमध्येइंजिनच्या बाबतीतही विविधता जपण्यात आली आहे. ग्राहकांना तीन इंजिन पर्याय निवडायला मिळतील. पहिला पर्याय 1.5-लिटर नैसर्गिक एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 115 BHP पॉवर आणि 144 Nm टॉर्कजनरेट करते. हे इंजिन मॅन्युअल आणि CVT गिअरबॉक्स अशा (automobile)दोन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. दुसरा पर्याय 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 160 BHP पॉवर आणि 253 Nm टॉर्क देते, आणि ते iMT आणि 7-स्पीड DCT ट्रान्समिशनमध्ये मिळेल. तिसरा पर्याय 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे, जे 160 BHP पॉवर आणि 250 Nm टॉर्कसह येते, आणि डिझेल इंजिन 19.1 किमी प्रति लिटर मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. हे इंजिन मॅन्युअल आणि 6-स्पीड AT गिअरबॉक्समध्ये उपलब्ध आहे.
या SUV मध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा वैशिष्ट्ये देखील आहेत. Android Auto आणि Apple CarPlay सपोर्टसोबत डिजिटल इन्फोटेनमेंट सिस्टम, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल , वायरलेस मोबाइल चार्जिंग , हवेशीर सीट्स , आणि मल्टीपल एअरबॅग्ज यांचा समावेश आहे. यासोबतच फीचर्स जसे की मल्टी-एंगल पार्किंग कॅमेरा , लेन असिस्टआणि क्रूझ कंट्रोल यांसारख्या आधुनिक सुविधांमुळे ही SUV अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर ठरते. किआ सेल्टोस 2025 SUV प्रेमींसाठी एक उत्तम पर्याय म्हणून उदयास येत आहे.
हेही वाचा :
होळीनिमित्त राज्यभरातील रेशन दुकानांवर अन्नधान्सासोबत फ्री साडी वाटप सुरु
लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणत्याही क्षणी फेब्रुवारीचा हप्ता येणार
कलाविश्वावर शोकाकळा! ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेते संतोष नलावडे यांचं अपघाती निधन