सामान्य नागरिकांना दिलासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहिर

आज देखील सकाळीच इंधनाचे ताजे दर जाहीर झाले (impact)आहेत. हाती आलेल्या दरांनुसार आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. कच्च्या तेलाच्या किंमतीत बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींवर होत असतो. अशात आज देखील सकाळीच इंधनाचे ताजे दर जाहीर झाले आहेत. हाती आलेल्या नवीन दरांनुसार आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही.

गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत तसेच स्थिर आहेत. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र पेट्रोल-डिझेलचा भाव आहे त्याहून आणखी (impact)कमी व्हावा असं सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे. अशात भाव कमी होत नसला तरी वाढत देखील नाही, ही सुद्धा एक दिलासादायक बाब म्हणावी लागेल.

मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची ८९.९७ रुपये प्रति लिटर इतकी किंमत आहे.

पुण्यात पेट्रोल १०४.३० रुपये प्रति लिटर या दरात आहे. तर डिझेलची किंमत ९०.८२ प्रति लिटर रुपयांवर आहे.

ठाण्यामध्ये पेट्रोलचा भाव १०३.५१ रुपये प्रति लिटर आहे. तसेच डिझेलचा दर ९०.०२ रुपये प्रति लिटर आहे

छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.३४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.८६ रुपयांवर कायम आहे.

नाशिकात पेट्रोलची किंमत १०४.७५ रुपये प्रति लिटर आहे. डिझेलची किंमत ९१.२६ रुपये प्रति लिटर आहे.

कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०५.३५ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय. तर डिझेलची किंमत ९१.८६ रुपयांवर स्थिर आहे.

नागपुरात पेट्रोलची किंमत १०४.०६ रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत ९०.६२ रुपये प्रति लिटर आहे.

नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ (impact)रुपये आहे तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे.

चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.८६ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.४४ रुपये आहे.

कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे.

नोएडामध्ये पेट्रोलचा भाव ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल ८७.८३ रुपये प्रति लिटर आहे.

हैदराबादमध्ये पेट्रोल १०७.५८ रुपये १ लिटर आहे. तसेच डिझेल येथे ९५. ८१ या भावाने विकलं जात आहे.

हेही वाचा:

विनेश फोगटचा कुस्तीला अलविदा: “माँ कुश्ती मेरे से जीत गई, मैं हार गई”

वजन वाढवण्याची भीती न करता पांढरे लोणी खा: याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

शक्तिपीठ महामार्ग विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची पुन्हा सुरुवात