पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर

 राज्यात पेट्रोल डिझेलच्या नव्या किंमती जाहीर झाल्या आहेत. आज पेट्रोल(diesel) डिझेलच्या भावात कोणताही बदल झालेला नाही. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

रोज पेट्रोल डिझेलच्या नवीन किंमती जाहीर होत असतात. मे महिन्याच्या अखेरपर्यंत पेट्रोल डिझेलच्या भावात बदल होतील, अशी आशा सर्वसामान्यांना होती. मात्र, आजही पेट्रोल डिझेलच्या भावात काहीच बदल झालेला नाही.

रोज सकाळी देशातील इंधन कंपन्या पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर करतात. (diesel)आंतरराष्ट्रीय तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. त्यानंतर देशात पेट्रोल डिझेलचे भाव ठरवले जातात. आज आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड ऑइल ७९.४९ डॉलरवर विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइल ८३.८० डॉलरवर विकले जात आहे. आज संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

दिल्लीत आज पेट्रोल ९४.७१ रुपये तर डडिेलच ८७.६२ रुपयांवर विकले जात (diesel)आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत १०४.२१ रुपये आहे तर डिझेलचा भाव ९२.१५ रुपये आहे.कोलकत्यात पेट्र्रोल १०३.९४ रुपयांना विकले जात आहे तर डिझेल ९०.७६ रुपयांना विकले जात आहे. चेन्नईत पेट्रोल १००.८५ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.४३ रुपयांना विकले जात आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

पुण्यात पेट्रोल १०४.२३ रुपये तर डिझेल ९०.७५ रुपये प्रति लिटर विकले जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा भाव १०४.६९ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेल ९१.२ रुपयांना विकले जात आहे, कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०४.४७ रुपयांना तर डिझेल ९१.०१ रुपयांना विकले जात आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये पेट्रोलचा भाव १०४.९९ आहे. तर डिझेल ९१.४८ रुपयांना विकले जात आहे. ठाण्यात पेट्रोल १०४.४१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.३४ विकले जात आहेमहाराष्ट्रात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील असा अंदाज होता. मात्र, गेल्या ४-५ महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात कोणतीही कपात झालेली नाही.

हेही वाचा :

कोल्हापूर: इन्स्टाग्रामवरची ‘भाईगिरी’ पडली महागात

कोल्हापुरात छत्रपती विरुद्ध मंडलीक चुरशीची लढत

राधानगरी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये 13 वर्षाच्या मुलीसह तिघांचा मृत्यू