ना इंटरनेट, ना कॉलिंग..Jio चं नेटवर्क गायब; नेमकं काय झालं?
मागच्या काही महिन्यांपूर्वी जिओने आपल्या इंटरनेटच्या(network) दरात वाढ केली. तसेच, मोबाइल रीचार्ज प्लॅन देखील वाढवण्यात आले. यामुळे ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात आपले सीमकार्ड बीएसएनएल या सरकारी टेलकॉम कंपनीमध्ये पोर्ट करू घेतले होते. याचा जिओला चांगलाच फटका बसला होता. अशात जिओमुळे पुन्हा एकदा ग्राहक त्रस्त झाले आहेत. आज 17 सप्टेंबररोजी जिओची सेवा अचानक ठप्प झाली.
यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. जिओची सेवा विस्कळीत झाल्याची माहिती समाज माध्यमांवर देण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर कमेंट आणि मीम्सचा पाऊसच पडला. अनेकांना सेवा ठप्प झाल्याचा मोठा फटका बसला.
जिओची सेवा विस्कळीत झाल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे. अवघ्या तासाभरात 10 हजार पेक्षाही अधिक तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. ग्राहकांनी इंटरनेट, कॉलिंग ठप्प पडल्याचे म्हटले आहे. 67 टक्के युझर्सने नो सिग्नल अशी तक्रार नोंदवली तर, काही जणांनी इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचे म्हटले आहे.
जिओची सेवा कोलमडल्याचा सर्वात जास्त परिणाम मुंबईत दिसून आला. यामुळे अनेक ग्राहकांना जिओच्या सेवाचा लाभ घेता आला नाही. नेटवर्क(network) डाऊन का झाले, याबाबत रिलायन्स जिओने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. आता युजर्स नेटवर्क कधी सुरळीत होणार याबाबत सोशल मिडीयावर टॅग करून विचारणा करत आहेत.
काही मीडिया रिपोर्टनुसार, 68 टक्के जिओ वापरकर्त्यांनी “नो सिग्नल” अशी तक्रार केली आहे. तसेच माय जिओ ॲप आणि जिओ वेबसाइट ऍक्सेस देखील डाउन झाली आहे. सोशल मीडियावर आता जिओ आणि अंबानी यांना नेटकरी टार्गेट करत आहेत. सध्या सोशल मीडियावर #jiodown ट्रेंड सुरू असल्याचं दिसून येतंय.
हेही वाचा:
उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त
‘या’ 5 राशींना अनंत चतुर्दशी पावणार, बाप्पा देणार सुख-समृद्धी!
प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; संतापलेल्या तरूणीने आईला संपवले