पाच महिने रिचार्ज करण्याची गरज नाही; 400 रुपयांचा हा प्लॅन प्लॅन चालेल 150 दिवस
खाजगी कंपन्यांच्या दरवाढीमुळे ग्राहक सरकारी कंपनी भारत संचार निगम लिमिटेड कडे वळत आहेत. कंपनीनं देखील नवीन ग्राहकांना टिकवण्यासाठी दीर्घ वैधता असलेला (recharge)प्लॅन ऑफर करत आहे. आज आपण BSNL च्या अश्याच एका दीर्घ वैधता असलेल्या प्लॅनची माहिती घेणार आहोत. या प्लॅनमध्ये 150 दिवसांच्या वैधतेसह फ्री कॉलिंग, डेटा आणि इतर अनेक बेनिफिट्स दिले जात आहेत. चला जाणून घेऊया याची माहिती.
कंपनीनं या (recharge)प्लॅनची किंमत 400 रुपयांच्या आत ठेवली आहे, हा प्लॅन त्या युजर्ससाठी योग्य ठरतो ज्यांना कमी किंमतीत जास्त वैधता हवी आहे. बीएसएनएल युजरससाठी या प्लॅनची किंमत 397 रुपये आहे, ज्यात 150 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.
तसेच तुम्हाला प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि डेली 2 जीबी डेटा देखील मिळतो. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये तुम्हाला रोज 100 एसएमएस देखील फ्री मिळणार आहेत. परंतु या प्लॅनमध्ये मिळणारे हे एक्स्ट्रा बेनिफिट्स फक्त 30 दिवस मिळतात. म्हणजे फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएस असे बेनिफिट फक्त 30 दिवस मिळतात, परंतु या प्लॅनची वैधता 150 दिवस आहे.
बीएसएनएलनं आपल्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त युजर्सना डेटा मोफत देत आहे. कंपनीनं 24GB मोफत डेटाची घोषणा केली आहे. या ऑफरचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांना 500 रुपयांपेक्षा जास्त रिचार्ज करावा लागेल. परंतु ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी आहे. ही ऑफर 1 ऑक्टोबर रोजी सुरु झाली असून 24 ऑक्टोबर पर्यंत वैध असेल.
भारत संचार निगम लिमिटेड गेल्या काही महिन्यांपासून टेलीकॉम सेक्टरमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे कंपनीनं देखील आता 5G र्सविसची टेस्टिंग सुरु केली आहे. त्यामुळे कंपनी लवकरच 5G सर्व्हिस सुरु करेल अशी चर्चा सुरु झाली आहे. तसेच, मीडिया रिपोर्टनुसार भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आंध्र प्रदेशचे प्रधान महाप्रबंधक, एल श्रीनु यांनी एका प्रेस कॉन्फ्रेंस मध्ये घोषणा केली होती की बीएसएनएल जानेवारी 2025 मध्ये आपली 5जी सर्व्हिस लाँच करण्याची तयारी करत आहे.
हेही वाचा :
सूरज चव्हाणचा पहिलाच सिनेमा वादाच्या भोवऱ्यात
धक्कादायक ! माती खाल्ल्याने आवळला दोन वर्षांच्या बाळाचा गळा
एम एस धोनी IPL 2025 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने दिले मोठे अपडेट्स
भाजपला रामराम, 19 वर्षानंतर राणे पुन्हा शिवसेनेत