आता AI बनणार शेतकऱ्यांचा मित्र, सांगणार कोणत्या पिकातून सर्वाधिक फायदा..

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारत देशात आजही चीनच्या तुलनेत पीक उत्पादन कमीच आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर भारतात गव्हाचं उत्पादन प्रति हेक्टर 2.7 टन इतकं आहे. चीनमध्ये हेच प्रमाण 6 टन इतकं आहे. म्हणजेच चीनमध्ये प्रति हेक्टरी गव्हाचं उत्पादन दुप्पट आहे. पण आता कृषी क्षेत्रात आणखी एका नव्या तंत्रज्ञानाचा प्रवेश झाला आहे. आता AI शेतात(farmers) कोणतं पीक घ्यायचं याची माहिती शेतकऱ्यांना देणार आहे.

भारतात अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. बहुतांश शेतकी असे आहेत ज्यांच्याकडे 1 हेक्टरपेक्षाही कमी जमीन आहे. त्यामुळे कोणत्या पिकामुळे जास्त उत्पादन मिळेल, नफा जास्त होईल हे निश्चित करताना शेतकऱ्यांना नेहमीच अडचणी येतात. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना(farmers) फायदाच होणार आहे.

कृषी क्षेत्रातील या नव्या अविष्कारावर दोन अभ्यास करण्यात आले. या दोन्ही अभ्यास एकाच निष्कर्षावर पोहोचले आहेत. रँडम फॉरेस्ट नावाचे मशीन लर्निंग मॉडेल पिकाची अचूक भविष्यवाणी करण्यात तरबेज आहे. हे मॉडेल अनेक लहान लहान अल्गोरिदमना एकत्र करुन काम करते ज्यामुळे अंदाज अचूक ठरतो.

पहिला अभ्यास लंडन येथील ब्रूनेल युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केला. या शास्त्रज्ञांनी देशातील 15 राज्यांतील 19 पिकांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले. यातून त्यांच्या असं लक्षात आलं की ज्यावेळी पर्यावरणीय आणि आर्थिक घटकांसह मागील काळातील आकडे मिळवून रँडम फॉरेस्ट मॉडेल उपयोगात आणले गेले त्यावेळी अधिक अचूक अंदाज मिळाला.

दुसरा अभ्यास आंध्र प्रदेशातील प्रकाशम इंजिनिअरिंग कॉलेजच्या शास्त्रज्ञांनी केला. या अभ्यासातही रँडम फॉरेस्ट मॉडेल दर्जेदार असल्याचे सिद्ध झाले. या टीमचं म्हणणं आहे की त्यांची सिस्टिम 22 विविध पिकांसाठी शिफारस करू शकते. दोन्हीही संशोधनातून एक गोष्ट अधोरेखित झाली आहे ती म्हणजे तंत्रज्ञान शेती आणि विज्ञानातील अंतर निश्चितच कमी होऊ शकतं. एआय आणि मशीन लर्निंगमध्ये टिकाऊ आणि फायदेशीर शेतीला(farmers) चालना देण्याची क्षमता आहे. बाजारातील मागणी आणि किंमत यांसारखी आणखी माहिती घेऊन पिकांची शिफारस करता येऊ शकेल.

हेही वाचा :