आता शुभमन गिलसोबत महवाशचा व्हिडीओ, युजर्स म्हणतात युजवेंद्र चहल भाईसोबत धोका?

टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत 12 वर्षांनी चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात आणण्याचा पराक्रम केला. त्यानंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीचा अतिम सामना पाहण्यासाठी भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (player)आणि आर जे महावश एकत्र आलेले पाहायला मिळाले.

दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्याही रंगू लागल्या. विशेष म्हणजे युजवेंद्र चहल याचा काही आठवड्यांपूर्वीच धनश्री वर्मा हिच्यासोबत घटस्फोट झालाय. त्यामुळे तो आर जे महावश सोबत स्पॉट झाल्याने सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा रंगू लागल्या आहेत.

दरम्यान, आर जे महावश आणि युजवेंद्र चहल(player) यांच्या प्रेमाची अफवा सुरु असतानाच एक जुना व्हिडीओ चर्चेत आलाय. शुभमन गिलवर एकतर्फी प्रेम करत असल्याचं सांगत आर जे महावशने एक कॉमेडी व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडीओने 2024 मध्ये शेअर केला होता.

मात्र युजवेंद्र चहलसोबत स्पॉट झाल्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाल्याचा पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत आर जे महावश काळीजादू करण्याबाबत बोलत आहे. जेणेकरुन तिचं एकतर्फी प्रेम यशस्वी व्हावं. हा व्हिडीओ तिने विनोदी पद्धतीने शूट केलाय.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलदरम्यान चहल आणि महवाश स्टेडियममध्ये एकत्र बसलेले पाहायला मिळाले. त्यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयही होता. पण हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली. काही आठवड्यांपूर्वी युजवेंद्र चहला पत्नी धनश्री वर्मासोबत घटस्फोट झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, चहल आणि महावश यांच्या नात्याचं पुढे काय होणार? याबाबत जाणून घेण्यात चाहत्यांची उत्सुकता वाढलीये.

युझवेंद्र चहल आणि आरजे महवाश यांच्या कथित नात्याच्या अफवा तेव्हा सुरू झाल्या जेव्हा दोघे 2024 मध्ये एकत्र ख्रिसमस साजरा करताना दिसले. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, त्यावेळी महवाश यांनी स्वत: पुढे येऊन या चर्चेचे खंडण केले आणि आम्ही फक्त मित्र असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा :

अजितदादांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; दोन बडे नेते राष्ट्रवादीत?

पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे अन्…, पीडितेच्या कुटुंबाने केली धक्कादायक मागणी

‘9 वर्षे हे सगळं सुरू…’ , गोविंदाचा ‘त्या’ गोष्टीबद्दल गौप्यस्फोट!

पत्नीच्या शरिराचे केले २०० तुकडे अन्…, पीडितेच्या कुटुंबाने केली धक्कादायक मागणी