‘ भारताविरुद्ध द्विपक्षीय सिरिजबद्दल पाकिस्तान बोर्डाच्या अध्यक्षांनी ठेवली अट
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघांत गेल्या जवळपास एक दशकात द्विपक्षीय मालिका झालेल्या नाहीत.(board) पण आता याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे.त्यातच भारताचा कर्णधार रोहित शर्माने एका मुलाखतीत पाकिस्तान संघाचे कौतुक करताना कसोटी मालिका खेळण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. आता याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नाकवी यांनीही त्यांचे मत मांडले आहे.
त्यांनी द्विपक्षीय (board)मालिका खेळण्याची तयारी दाखवली असली, तरी त्याआधी एक अटही ठेवली आहे. त्यांनी म्हटले आहे की पुढीलवर्षी पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आधी भारतीय संघाने यावे, त्यानंतर याबाबत विचार करू.पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार लाहोरमधील एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलतात नाकवी यांना रोहित शर्माच्या द्विपक्षीय मालिकेबाबतच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले.
त्यावर ते म्हणाले, ‘हे पाहा जर यासंबंधी जर काही पर्याय आमच्या समोर आले, तर आम्ही विचार करू. सध्यातरी आमचे लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यावर आहे आणि आधी या स्पर्धेसाठी भारतीय संघाला येथे येऊ देत.’
‘सध्यातरी चॅम्पियन्स ट्रॉफीपर्यंत कोणतीही जागा खाली नाहीये, आमच्या संघाचे तोपर्यंत वेळापत्रक व्यस्त आहे.’नाकवी पुढे म्हणाले, ‘एकदा ते इकडे आल्यानंतर आम्ही आमच्या समोर आलेल्या प्रस्तावावर नक्कीच विचार करू.’
दरम्यान, पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार आहे की नाही, याबाबत अद्याप बीसीसीआयने भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. त्यामुळे आता बीसीसीआय काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकांबद्दल सांगायचे झाले, तर दोन्ही देशांतील राजकीय तणावामुळे 2012-13 नंतर या दोन संघात कोणतीही द्विपक्षीय मालिका झालेली नाही.
गेल्या 10 वर्षात हे दोन संघ केवळ आयसीसीच्या आणि आशियाई स्पर्धांमध्ये आमने-सामने आले आहेत. तसेच 2007 नंतर भारतीय संघही पाकिस्तानला गेलेला नाही.
हेही वाचा :
मॅच झाल्यानंतर रोहित शर्माच्या कृतीमुळे हार्दिक आणि मुंबई इंडियन्सला मिरची झोंबली
कुख्यात गुंड अरुण गवळीच्या स्वागतासाठी राजकीय पायघड्या
फडणवीसांच्या मुख्यमंत्रिपदाच्या ऑफरबाबत आदित्य ठाकरेंनी सर्वच सांगितलं