भांडण आणि त्यातही महिलांची(woman) भांडण फारच चर्चित. आपण बऱ्याचदा ट्रेनमध्ये रंगलेली महिलांची भांडणं पाहिली असतील, यात अनेकदा गोष्ट हाणामारीपर्यंत पोहचते पण नुकताच सोशल मिडियावर मुलींच्या हाणामारीचा एक अनोका व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात मुलींनी भररस्त्यातच एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

गोष्ट पुढे इतकी वाढली की सर्वच एकमेकींवर तुटून पडल्या. या सर्व ड्रामामध्येच एका मुलीने(woman) दुसऱ्या मुलीला धक्का मारला आणि यातच ती अशा जागी जाऊन पडली की पाहून सर्वांनाच धक्का बसला. मुलीची अवस्था इतकी बिकट होते की सर्वजणी भांडण सोडून तिला वाचवण्यासाठी धाव घेतात. घटनेत पुढे काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन मुली कशावरून तरी भांडताना दिसत आहेत. जवळ उभ्या असलेल्या इतर मुली भांडणाचा आनंद असतात, जणू काही हा लाईव्ह शो आहे. दोघीही एकमेकांना ढकलत आणि केस ओढत होत्या. वातावरण थोडे तापले होते आणि यादरम्याच, एक मुलगी दुसऱ्या मुलीला जोरदार धक्का मारते. या धक्क्यात मुलगी आणखीन कुठे नाही तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यात जाऊन पडते.

मुलीचं डोकं नाल्यात आणि पाय हवेत अशी हास्यास्पद अवस्था तिथे घडते, ज्यानंतर इतर मुली धावत पळत तिला वाचवण्यासाठी तिच्या दिशेने धाव घेतात. नाल्यात पडलेल्या मुलीचे पाय पकडून तिला बाहेर काढले जाते. गरम झालेले संपूर्ण वातावरण क्षणातच या घटनेने हास्याचे रुप घेते. मुलींची ही अनोखी फाईट आता सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली असून यातील दृश्य पाहून लोकांना आपले हसू काही केल्या थांबवत्या येत नाहीये.

हा सर्व प्रकार @VishalMalvi_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आह, ‘दोन छपरी मुलींमधील कलेश’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ही तर नाला साफ करण्याची गोष्ट झाली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्वा, पाहायला फार मजा आली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “छपरीगिरी सुरु आहे”.

हेही वाचा :

पोलिस अधिकाऱ्याने सोडली लाज; विनापँट कोर्टात झाला हजर, जजने देखील फिरवले डोळे Video Viral

Paytm ची मोठी घोषणा! पेटीएम मनीने मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी दर केला कमी

IPL 2026 मध्ये मोठी अपडेट! युवराज सिंग परतणार…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *