पाकिस्तानने केली मोठी घोषणा; BCCI उचलणार  मोठं पाऊल?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात मोठी घोषणा(bcci tickets) केली आहे. पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तीन ठिकाणांची निवड केली आहे. पीसीबीने ही तिन्ही ठिकाणे यादी आयसीसीकडे पाठवली आहे. लाहोर, कराची आणि रावळपिंडी ही तीन ठिकाणे आहेत. वृत्तानुसार, भारताचे सामनेही येथे ठरले आहेत. आता पाकिस्तानच्या या घोषणेनंतर बीसीसीआयकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहायचे आहे.

खंर तर यावेळी पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवत आहे. पण भारतीय(bcci tickets) संघ तिथे खेळायला जाणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आशिया कपचे यजमानपदही पाकिस्तानलाच दिले होते, पण त्यानंतर भारतीय संघाने तेथे खेळण्यास नकार दिला. आणि त्यानंतर पाकिस्तानला भारताचे सामने श्रीलंकेत आयोजित करावे लागले.

पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी लाहोरमध्ये पत्रकार परिषदेत चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक आणि ठिकाणांबाबत मोठा खुलासा केला. ते म्हणाले, आम्ही आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक आयसीसीकडे पाठवले आहे. आयसीसीची टीम इथे आली आणि आमची बैठक खूप चांगली झाली. त्यांनी येथील व्यवस्थेचा आढावा घेतला आणि स्टेडियमच्या बाबतची माहितीही त्यांच्याशी शेअर केली. आम्ही आयसीसीच्या सतत संपर्कात आहोत. पाकिस्तानमध्ये एक उत्तम स्पर्धा आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

भारतीय संघाने पाकिस्तानत 2008 मध्ये शेवटचा आशिया कप खेळला होता. तेव्हापासून पाकिस्तानच्या संघाने आयसीसी स्पर्धांसाठी तीन वेळा भारताचा दौरा केला आहे. मात्र, आता प्रथमच आयसीसीचा मोठा कार्यक्रम पाकिस्तानमध्ये आयोजित केला जाणार असून, यावेळी बीसीसीआयची भूमिका काय असते हे पाहायचे आहे. सरकारची परवानगी मिळाल्यानंतरच भारतीय संघ पाकिस्तानला खेळण्यासाठी जाईल.

काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की, पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी यांना चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानात येण्याचे आश्वासन भारताकडून हवे आहे. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप असे कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही.

हेही वाचा :

पुढील 48 तासात मोदींच्या महाराष्ट्रात अर्धा डझन सभा! कोणासाठी, कुठे घेणार सभा? 

जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क ‘सेक्स डॉल’..