धोनीचा जबरा फॅन! माहिसाठी गर्लफ्रेंडशी ब्रेकअप, कारण काय तर… पोस्टर व्हायरल

आयपीएल 2024 मध्ये रविवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने(poster) सनरायजर्स हैदराबादवर 78 धावांनी मात केली. चेन्नई सुपर किंग्सचा दहा सामन्यातील हा पाचवा विजय ठरला आहे. या विजयाबरोबरच चेन्नई पॉईंटटेबलमध्ये थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर सनरायजर्स हैदराबादची तिसऱ्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. आतापर्यंत झालेल्या जवळपास सर्व आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्सने प्ले ऑफमध्ये धडक मारली आहे. यंदाही प्ले ऑफच्या शर्यतीत चेन्नईने आपलं आव्हान कायम ठेवलं आहे.

चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादच्या(poster) सामन्यादरम्यान एक मजेदार गोष्ट घडली. याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. चेन्नईच्या एम एम चिदम्बरम स्टेडिअमवर हा सामना खेळवण्यात आला होता. सामना सुरु असताना स्टेडिअममधल्या एमएस धोनीच्या एका फॅनने झळकावलेलं पोस्टर सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. धोनीवरच्या प्रेमाखातर या फॅनने असा निर्णय घेतला होता, की जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. धोनीसाठी या फॅनने चक्क आपल्या गर्लफ्रेंडशी ब्रेक अप केलं. कारण काय तर तिच्या नावाच्या अक्षरांची संख्या सात येत नाही.

स्टेडिअममध्ये हातात पोस्टर पकडलेला तरुण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणाने आपल्या पोस्टरवर ‘ मी माझ्या गर्लफ्रेंडशी या कारणासाठी ब्रेक अप केलं. कारण तिच्या नावात सात अक्षर येत नाहीत’ असं लिहिलं होतं. महेंद्रसिंग धोनीसाठी सात हा आकडा लकी आकडा आहे. तरुणाचं हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.

सात हा नंबर भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिष्ठित नंबरपैकी एक आहे. बीसीसीआयने सात हा नंबर यापुढे कोणत्याही खेळाडूला देणार नसल्याचं जाहीर केलं आहे. कारण या नंबरची जर्सीचा महेंद्रसिंग धोनीशी संबंध आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातिल सर्वात यशस्वी कर्णधार असलेला एमएस धोनीचा टीम इंडियात सात हा जर्सा क्रमांक होता. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण त्याच्या सन्मानार्थ बीसीसीआयने सात नंबरची जर्सी इतर कोणत्याही खेळाडूला देणार नसल्याचं सांगितलं.

धोनीने एका मुलाखतीत सात नंबर आपल्यासाठी का लकी आहे हे सांगितलं होतं. धोनीचा जन्म सात तारखेला झाला आहे. शिवाय जन्म महिनाही सातच आहे. 1981 हा त्याचा बर्थ इअर आहे. म्हणजे 8-1 = 7. यासाठी धोनीने टीम इंडियात आपल्या जर्सीसाठी हा नंबर निवडला होता. दरम्यान, आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोनीने महाविक्रम रचला आहे. आयपीएलमध्ये 150 सामने जिंकणारा महेंद्रसिंग धोनी हा पहिला क्रिकेटर ठरलाआहे. अशी कामगिरी इतर कोणत्याही खेळाडूने केलेली नाही.

हेही वाचा :

सुंदर पिचाई यांचा मोठा निर्णय; संपूर्ण ‘पायथन’ टीमला दाखवला बाहेरचा रस्ता

पाकिस्तानने केली मोठी घोषणा; BCCI उचलणार  मोठं पाऊल?

आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क ‘सेक्स डॉल’..