पाकिस्तानी क्रिकेटर करणार भारतीय हिंदू तरुणीशी लग्न; लग्नाआधीच ‘ती’ स्वीकारणार इस्लाम

पाकिस्तानमधील क्रिकेटपटू रझा हसन लवकरच विवाहबंधनात (marriage)अडकणार आहे. विशेष म्हणजे रझा हसनची होणारी पत्नी भारतीय आहे. रझाने नुकतीच एंगेजमेंट केली आहे. रझाच्या होणाऱ्या पत्नीचं नाव पूजा बोमन असं आहे. या दोघांची एंगेजमेंट नुकतीच अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये पार पडली. हे दोघे पुढील वर्षी लग्न बंधनात अडकणार आहेत.

पूजा ही हिंदू धर्मीय आहे. मात्र लग्नापूर्वी(marriage) पूजा धर्मांतर करुन इस्लाम धर्म स्वीकारणार आहे. मात्र हे धर्मांतर पूजा स्वइच्छेने करत आहे की तिला लग्नापूर्वी रझाने तशी अट घातली आहे यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नसल्याचं पाकिस्तानी प्रसारमाध्यांचं म्हणणं आहे.

रझाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट केली होती. त्यामध्येच त्याने आपल्या एंगेजमेंटची घोषणा केली. “सांगायला आनंद होतोय की मी आता एंगेज आहे. तू आयुष्यभरासाठी माझी हो अशी मागणी मी तिला घातली आणि तिने होकार दिला आहे. भविष्यातील दोघांच्या एकत्रित वाटचालीसाठी फार उत्साही आहे,” असं रझाने दोघांचा एंगेजमेंटमधील फोटो शेअर करत म्हटलं आहे.

रझा हा मूळचा पाकिस्तानी असला तरी तो मागील काही वर्षांपासून तो अमेरिकेमध्ये स्थायिक झाला आहे. तो 32 वर्षांचा आहे. विशेष म्हणजे भारतीय महिलेशी लग्न करणारा रझा हा काही पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू नाही. यापूर्वी शोएब मलिक, हसन अली, मोसीन खान आणि जहीर अब्बास यांनीही भारतीय महिलांना आपला आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडलं आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूबरोबर लग्न करणाऱ्या सर्वात प्रसिद्ध भारतीय महिलेबद्दल बोलायचं झालं तर भारतीय टेनीसपटू सानिया मिर्झाचं नाव घ्यावं लागेल. काही महिन्यांपूर्वीच सानिया आणि शोएबचा घटस्फोट झाला आहे.

रझा हसनने 2012 साली पाकिस्तानकडून अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तो पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्याचं करिअर फारच छोटं राहिलं. रझा हसन हा डावखुरा फिरकी गोलंदाज होता. तो एक एकदिवसीय सामना आणि 10 टी-20 सामने खेळला आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने एक तर टी-20 सामन्यामध्ये पाकिस्तानसाठी 10 विकेट्स घेतल्या आहेत.

2012 च्या टी-20 वर्ल्ड कप संघामध्ये रझा हसनची निवड करण्यात आली होती. मात्र त्याला प्रभावशाली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर निवड समितीने त्याच्याकडे कानाडोळा केल्याने केवळ एक एकदिवसीय सामना आणि 10 टी-20 सामन्यांमध्ये त्याचं करिअर संपुष्टात आलं. आता तो अमेरिकेत स्थायिक झाला आहे.

हेही वाचा :

इराण-इस्रायलच्या युद्दात ‘या’ कंपन्या तुम्हाला करणार मालामाल

‘मला त्याने खोलीत बोलवलं आणि ग्रुप सेक्स…’; अभिनेत्रीच्या खुलाशाने खळबळ

बायकोच्या अफेअरच्या संशयातून डॉक्टरची हत्या, नवऱ्यानं अल्पवयीन मुलाला सुपारी देत काटा काढला