पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

नवी दिल्ली- गेल्या काही आठवड्यात चढे राहिलेले कच्च्या तेलाचे(diesel) दर आता स्थिर झाले आहेत. कच्च्या तेलाचे दर गेल्या सात आठवड्यातील सर्वात निच्चांकी पातळीवर गेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती ८० डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

कच्च्या तेलाच्या एका बॅरलची(diesel) किंमत ७८.९९ डॉलर झाली आहे. काही काळापूर्वी कच्च्या तेलाची किंमत ९१ डॉलरपर्यंत पोहोचली होती. पण, आता यात घट झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर येत्या काळात सरकार महत्त्वाचा निर्णय घेतं का हे पाहावं लागणार आहे.

सध्या जागतिक स्थिती स्फोटक आहे. जगातील काही भागात दोन देशांमध्ये संघर्ष सुरु आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष सुरु होऊन आता दोन वर्ष होत आहेत. रशिया हा मोठा तेल निर्यात करणारा देश आहे. त्यामुळे या देशातील परिस्थितीचा परिणाम तेलाच्या व्यवहारावर होतो.

दुसरीकडे, ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राइलवर हल्ला केला होता. इस्राइलने त्याला प्रत्यु्त्तर दिलं आहे. युद्धात इराणने देखील एन्ट्री केली आहे. इराणकडून इस्राइलवर मिसाईल डागण्यात आले आहेत. तुर्तास या देशांमध्ये तणाव आहे. मध्य आशियातील परिस्थिती तेलाच्या किंमतीवर परिणाम पाडत असते.

कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये घट होण्याचे पडसाद शेअर मार्केटवर देखील पाहायला मिळाले आहेत. सरकारी तेल कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. बीपीसीएलचे शेअर्स ४.४३ टक्क्यांनी वाढून ६३४.८० रुपयांवर गेले आहेत. एचपीसीएलचे शेअर्स ७.६७ टक्क्यांनी वाढून ५३३.२० रुपये किंमतीचे झाले आहेत. आयओसीचे शेअर्स २.६० टक्क्यांनी वाढून १७३.३५ रुपयांवर बंद झाले. एकंदरीत सकारात्मक परिणाम शेअर मार्केटवर पडला.

हेही वाचा :

रोहित शर्माच्या ‘या’ सवयीने संपूर्ण टीम इंडिया हैराण

महायुतीत ठाण्याच्या जागेवरुन भाजप पदाधिकारी आक्रमक

जान्हवी कपूर महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्याच्या नातवाच्या प्रेमात, अखेर अभिनेत्रीने गळ्यात..