महाराष्ट्रात दुबईचा फिल! अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस; पुरजन्य परिस्थिती
महाराष्ट्रात एकीकडे उन्हाचा तडाखा वाढला असताना दुसरीकडे राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा(rain) तडाखा बसला आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तुफान पाऊस पडला आहे. सोलापुरात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे दुबई शहर पूर्णपणे बुडाले आहे. महाराष्ट्रातील काही भांगात अशीच काहीशी स्थिती पहायला मिळत आहे.
पुण्यासह राज्यातील बारा जिल्ह्यात वादळी पावसाचा(rain) इशारा देण्यात आलाय. राज्यात पावसाला पोषक हवामान झालंय. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यताय. राज्यात उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याचं देखील हवामान विषयक अंदाजात नमूद करण्यात आलंय.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात जोरदार पाऊस पडला आहे. काही गावांमध्ये पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अक्कलकोट तालुक्यातील बसलेगाव ते गरोळगी या दोन गावाची वाहतूक बंद झाली आहे.अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
लातूर जिल्ह्यातील अनेक भागात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. निलंगा तालुक्यातील कासार शिरशी हसोरी परिसरात वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस पडला आहे. या वादळी वाऱ्याने गाऱ्याच्या पावसामुळे आंबा, ज्वारी यासारख्या पिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील विद्युत पुरवठा ह बंद करण्यात आला आहे.
या अगोदर दोन दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात औसा तालुक्यातील काही गावांना वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस झाला होता. त्यामध्येही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे नुकसान झालं होतं. त्यानंतर आता जिल्ह्यातील सर्वच भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील ज्वारी, द्राक्ष, केळी उत्पादक शेतकरी आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी आता धास्तावले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील सीमा भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. तर शिरोळ, जयसिंगपूर, कुरुंदवाड परिसराला जोरदार पावसानं अक्षरश: झोडपून काढलं.. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिक, व्यापा-यांची चांगलीच तारांबळ उडाली. तसंच काही भागांतील बाजारपेठेत पाणी घुसल्यानं जनजीवन विस्कळीत झालं.
वाशिमच्या वाघोली खूर्द परिसरात काल झालेल्या अवकाळी पावसामुळं गावातील अनेक घरांवरील पञे ऊडून गेली….त्यामुळे अन्न-धान्य भिजलं असून घराची पडझडही झालीये…तसंच विद्युत खांब कोसळ्ल्यानं वीज पुरवठा खंडित झालायं…तर अनेकांचे संसार हे उघड्यावर आलेय…त्यामुळं शासनानं तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली…
हेही वाचा :
धक्कादायक! ४७ वर्षीय गायिकेचा मृत्यू; घरात आढळला मृतदेह
देशातील जनता PM मोदींना सत्तेतून अलविदा करणार; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं विधान
राज्यात समाजवादी पक्षाला मोठा धक्का, रईस शेख यांची पक्षाला सोडचिठ्ठी; अजित पवार गटात करणार प्रवेश?