‘महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर..’; उद्धव ठाकरेंवर बावनकुळेंचा पलटवार!
लोकसभा निवडणुकीमुळे सध्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचं राजकीय(competition) वातावरण कमालीचं तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्रातील मागील दोन वर्षात घडलेल्या नाट्यमय राजकीय घडामोडींमुळे यंदाची लोकसभा निडणूक अधिकच रंगतदार झाल्याचे दिसत आहे. शिवाय, यामुळे एकमेकांवर टीका करताना कोणतीह मर्यादा राहिली नसल्याचे राजकीय नेत्यांच्या वक्तव्यांवरून दिसत आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(competition) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अशीच काहीशी टीका केली, ज्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेख बावनकुळे यांच्याकडूनही जोरदार प्रत्युत्तर दिलं गेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे नालायक आणि कोडगे आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
ज्यामुळे संतप्त झालेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्वीटद्वारे उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिले. बावनकुळे म्हणाले, ‘ महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला होता. पालघर साधू हत्याकांडात ठाकरे मूग गिळून गप्प बसले, 100 कोटी वसुली रॅकेट चालवत कारभार केला, कोविडमध्ये लोक मरत असताना घोटाळे केले, मृतदेहाच्या बॅगमध्ये मलिदा लाटला. याला कोडगेपणा म्हणतात.’
तसेच ‘देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्रिपदावर बसायचं, मुलाला मंत्रिपद द्यायचं आणि बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडायचं याला कोडगेपणा म्हणतात.’ असंही बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला होता.
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 20, 2024
पालघर साधू हत्याकांडात ठाकरे मूग गिळून गप्प बसले, १०० कोटी वसुली रॅकेट चालवत कारभार केला, कोविडमध्ये लोक मरत असताना…
याशिवाय, ‘लोकसभा निवडणुकीत जनाधार मिळत नसल्यानं उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली आणि वाट्टेल ते बडबडत आहेत. तुम्ही कितीही शिव्याशाप द्या, देवेंद्र फडणवीसांसारख्या सच्चा नेत्याला त्यानं फरक पडणार नाही पण येत्या निवडणुकीनंतर जनता तुम्हाला मात्र कायमचं घरी बसवेल हे नक्की.’ अशा शब्दांमध्ये बावनकुळे यांनी टीका केली आहे.
हेही वाचा :
IRCTC चा हनिमून टूर पॅकेज! पार्टनरसोबत फिरा युरोप, पॅकेज खर्च किती?
सकाळी सभा झाली, अणि संध्याकाळी अवकाळी पाऊस; आदित्य ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हनीमूनला जाताना ऐश्वर्या राय हिला ‘या’ मोठ्या गोष्टीची झाली जाणीव, अभिषेक बच्चनही..