नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट, मुंबईत बॉम्बस्फोट होणार… 

गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलीस आणि मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला सातत्याने वेगवेगळ्या धमक्यांचे(bomb) कॉल येत आहेत.अशातच आज (7 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा संदेश मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला मिळाला आहे.

यावेळी केवळ संदेशच नाही तर हत्येची योजना आखणाऱ्या व्यक्तीचा फोन नंबरही पाठवण्यात आला होता. मेसेजमध्ये संबंधित व्यक्तीने मुंबई आणि धनबाद येथे बॉम्बस्फोट(bomb) घडवून आणला जात असल्याचे म्हटले आहे. या धमकीनंतर आता पोलिस अर्लट मोडवर आले असून याप्रकरणी चौकशी सुरु आहे.

नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा संदेश वाहतूक पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाला.शनिवारी पहाटे हा संदेश पाठवण्यात आला. या संदेशात संशयित व्यक्तीचे नाव आणि नंबर देखील पाठवण्यात आला. यासोबत काही आरोपही करण्यात आली आहेत. प्रिन्स आणि इफान अशा दोन संशयित व्यक्तींच्या नावाचा उल्लेख त्या संदेशात करण्यात आलाय.

पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा संदेश मिळाल्यानंतर मुंबई वाहतूक नियंत्रण विभागाने मुंबई पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी आता पोलिसांकडून तपास केला जातोय. गेल्या काही दिवसांपासून सतत धमकीचे कॉल येण्याचे प्रमाण वाढले आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देखील सतत फोन करून दिली जातंय. काही दिवसांपूर्वी फोन करून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

याप्रकरणी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची माहिती मुंबई वाहतूक पोलिसांना शनिवारी मिळाली.बॉम्बस्फोटाच्या(bomb) माध्यमातून ही हत्या केली जाऊ शकते, असा मेसेज पाठवण्यात आला. या मेसेजमध्ये पाकिस्तानच्या आयएसआयचे एजंट असल्याचा दावा करणाऱ्या दोन व्यक्तींची नावे आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन करून धमक्याही दिल्या जात होत्या. यानंतर पोलिसात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल केला असता. लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलत होते की फोनवर बोलत होते. इंडियन एअरलाइन्सलाही गेल्या महिन्यात अनेक धमकीचे कॉल आले होते. पुढे इंडियन एअरलाईन्सचे मोठे नुकसान होऊ लागले. विमान कंपन्यांकडून येणारे धमकीचे कॉल परदेशातून वारंवार आले पाहिजेत.

पंतप्रधान मोदींना दुसऱ्यांदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. २७ नोव्हेंबरला पोलिसांना पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देणारा निनावी फोन आला. कॉल केल्याच्या संशयावरून एका ३४ वर्षीय महिलेला ताब्यात घेण्यात आले असून अधिकारी तिच्या पार्श्वभूमीची पडताळणी करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नियंत्रण कक्षाला सकाळी 9 वाजून 13 मिनिटांनी फोन आला आणि महिलेने दावा केला की, मोदींच्या हत्येचा कट रचला गेला होता आणि एक शस्त्र वापरण्यासाठी तयार होते. फोन करणाऱ्याचे शेवटचे मोबाइल लोकेशन अंधेरी येथे सापडल्याने आंबोली पोलिस स्टेशनने शोध सुरू केला. मात्र, फोन बंद असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा :

लाडक्या बहिणींना ७५०० मिळालेच नाहीत, पुन्हा अर्ज करता येणार?

पुढील निवडणूक शेवटची’ हसन मुश्रीफांचं मोठं विधान चर्चेत..

धक्कादायक! तरुणीचा फिरत्या पाळण्यातून तोल गेला अन्…; घटनेचा थरारक VIDEO