मीरा-भाईंदरमध्ये महाराष्ट्र (political news)नवनिर्माण सेनेकडून आयोजित करण्यात आलेल्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मध्यरात्री ताब्यात घेतले आहे. काहींना तर पहाटे ३ वाजता घरातून उचलून नेले गेले आहे. कलम १६३ अंतर्गत नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
मराठी-हिंदी भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चामुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. मनसे नेते अविनाश जाधव यांना काल रात्री ताब्यात घेतले गेले. त्याचबरोबर मनसेचे इतर सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांना मीरा-भाईंदर परिसरात जमू नये, अशा नोटिसा देण्यात आल्या आहेत.
वसई-विरार परिसरातही मोठी कारवाई :
मीरा-भाईंदरमधील आंदोलन रोखण्यासाठी वसई-विरार पोलिसांनीही(political news) सक्रीय भूमिका घेतली आहे. स्थानिक मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पहाटे घरातून उचलण्यात आले. यामध्ये पालघर लोकसभा अध्यक्ष जयेंद्र पाटील, माजी नगरसेवक प्रफुल पाटील, वसई-विरार शहराध्यक्ष प्रवीण भोईर यांच्यासह अनेक जणांचा समावेश आहे.
हे सर्वजण पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यांत नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी मोर्चामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली असल्याचे सांगितले आहे.
वरिष्ठ नेत्यांना थेट बंदी आदेश :
मनसे नेते संदीप देशपांडे आणि माजी आमदार राजू पाटील यांना थेट मीरा-भाईंदरमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांनाही कलम १६३ अंतर्गत नोटीस बजावल्या असून, संदीप देशपांडे यांच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये १४ गुन्हे दाखल असल्याची नोंद त्यात आहे.
मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनाही मोर्चात सहभागी होऊ नये म्हणून नोटीस देण्यात आली आहे. भाषिक वादामुळे परिसरात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे सर्व प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आले आहेत.
हेही वाचा :