साखरपुडा मोडला, नराधम पिसाळलाच! तिचं मुंडकं छाटून गावभर फिरला

कर्नाटकमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे(marriage). १६ वर्षीय एका तरुणीचे डोके उडवण्यात आले आहे. भयानक म्हणजे असे कृत्य करणारा तिचा होणारा पतीच होता. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीचा साखरपुड्याचा कार्यक्रम सुरु होता. बाल कल्याण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अचानक येऊन अल्पवयीन मुलीचा साखरपुडा थांबवला होता.

आरोपीने पीडित मुलीचं डोकं धडापासून वेगळं केलं. आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे(marriage). ३२ वर्षीय प्रकाश मीनासोबत लग्न करणार होता. मीनाने दहावीची परीक्षा दिली होती, ज्याचा निकाल एक दिवसांपूर्वीच लागला होता. तिला ५२ टक्के मार्क मिळाले होते. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. कर्नाटकच्या मधीकेरी जिल्ह्यातील सुरलब्बी गावातील ही घटना आहे.

मीनाचे लग्न ठरले होते. तिच्या साखरपुड्याचा कार्यक्रम सुरु होता, पण काहींनी बाल कल्याण विभागाला याची माहिती दिली होती. त्यानंतर बाल कल्याण विभागाचे कर्मचारी मीनाच्या घरी आले आणि त्यांनी साखरपुडा थांबवला. तिच्या लग्नामुळे पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होईल आणि सर्वांना तुरुंगात जावं लागेल असं कर्मचाऱ्यांनी समजावलं. त्यामुळे मीनाच्या आई-वडिलांनी साखरपुडा थांबवला आणि १८ वर्षानंतरच मुलीचं लग्न लावण्याचं ठरवलं.

बाल कल्याण विभागाचे अधिकारी गेल्यानंतर प्रकाश संतापलेला घरी आला. त्याने मीनाच्या आई-वडिलांना मारहाण केली. धारधार शस्त्राने आई-वडिलांवर हल्ला केला. त्यानंतर त्याने मीनाला घराच्या बाहेर ओढत आणलं आणि तिचं डोकं उडवलं. त्यानंतर तो घटनास्थळावरुन पसार झाला आहे. सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश फरार असून त्याचा शोध सुरू आहे. आरोपीला पकडण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याची माहिती पोलीस अधिकारी रामराजन के यांनी पीटीआयला बोलताना दिली. पीडितेच्या आई-वडिलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये हत्येच्या प्रकरणी आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

जबरदस्त फीचरसह क्‍यू३ आणि ऑडी क्‍यू३ स्‍पोर्टबॅक बोल्‍ड एडिशन लाँच

मी गॅरंटी देतो.. सलमानच्या लग्नाबाबत मिथुन चक्रवर्ती यांची प्रतिक्रिया

काँग्रेसला राम मंदिराच्या जागी पुन्हा मशीद बांधायचीय; भाजप नेत्याचं खळबळजनक विधान