पंतप्रधान मोदी यांनी केला भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध .

Prime Minister Modi released the manifesto of BJP.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने रविवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. मोदी की गँरंटी भाजपा संकल्प असे या जाहीरनाम्याचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा यांच्या हस्ते भाजप मुख्यालयात हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते.

भाजपाच्या जाहीरनाम्यात काय ?

प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आयुष्यमान भारत योजनेचा लाभार्थी
प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला ५ लाखापर्यंत उपचार अर्थसहाय्य
विजेचे बिल कमी करण्याचा संकल्प
मुद्रा कमाल कर्जमर्यादा २० लाख रुपये
वर्ष २०२९ पर्यंत गरिबांना शिधा मोफतच
स्वयंपाकाचा गॅस घरोघरी पाईपने पोहचवणार
महिला सक्षमीकरण ही सर्वोच्च प्राथमिकता
येत्या पाच वर्षात ३ कोटी लखपती ताई घडवणार
तृतीयपंथी समाजालाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ – मोदी
महिला खेळाडूंना विशेष प्रोत्साहन
सर्वायकल कॅन्सर मुक्तीसाठी अभियान
गरीब कल्याण योजनेचा विस्तार करणार – मोदी
पंतप्रधान कृषीविकास धोरण दहा कोटी शेतकऱ्यांसाठी सुरूच राहील
कृषी उत्पादनांच्या साठवणुकीसाठी प्रोत्साहन मिळेल
भारताला अन्नप्रक्रिया उद्योगाचे जागतिक केंद्र बनवणार
तमिळ भाषेच्या प्रसारासाठी काम करणार – मोदी
पर्यटन प्रोत्साहनावर विशेष भर
वाहन चालकांसाठी द्रुतगती मार्गांवर विश्रांती गृह – मोदी
परिवहन विस्तारासाठी विशेष उपाययोजना
देशभरात बुलेट ट्रेन धावणार
इंधन आत्मनिर्भरता हे विशेष धेय्य
अंतराळात भारताचा ठसा उमटवणार
एक राष्ट्र एक निवडणूक घडवू*
भ्रष्टाचारविरोधी कारवाई सुरूच राहील – मोदी
आगामी सरकारच्या पहिल्या शंभर दिवसाचे कामकाज नियोजन सुरू
भारताच्या प्रगतीला आता कुणी रोखू शकत नाही
भारताच्या विकासासाठी आम्हाला आशीर्वाद द्या – मोदी