‘धनुष्यबाणाच्या मंचावर राज ठाकरे….’, राजू पाटील यांचं मोठं वक्तव्य

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात सभा(the stage) आयोजित करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर त्यांची आज पहिल्यांदाच ठाण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे. ठाणे शहरालगत असलेल्या कळव्यात राज ठाकरे यांची आज सभा पार पडत आहे. या सभेसाठी कल्याण, डोंबिवली येथील मनसैनिक आणि शिवसैनिकदेखील कळव्याला दाखल होत आहेत.

राज ठाकरे यांची ही सभा शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे उमेदवार(the stage) श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली आहे. या सभेनिमित्त मनसे आमदार राजू पाटील यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी राजू पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं.

“मराठी माणूस राज ठाकरेंना धनुष्यबाणाच्या मंचावर बघायला उत्सुक आहे. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिरूप आहेत”, असं मनसे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे. “ठाकरेंनी हिंदुत्वासोबत असावं ही हिंदुत्वाची इच्छा पूर्ण होणार. तसचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे महान व्यक्तीमत्व आहे. त्यांच्यावर मी फार बोलणार नाही”, अशी टीकादेखील राजू पाटील यांनी केली आहे.

“आमच्यासाठी राज ठाकरे यांची सभा ही पर्वणीच असते. पण आमच्यासारखेच बहुसंख्य शिवसैनिक, मराठी माणूस राज ठाकरे यांना धनुष्यबाणाच्या मंचावर बघायला आसूसलेला होता. त्यांची आज या निवडणुकीच्या निमित्ताने याबाबतची इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. त्यामुळे आम्ही भरभरुन जसे जाणार आहोत तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिवसैनिकही तिथे जाणार आहेत”, असं राजू पाटील म्हणाले.

“राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिरूप आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा राज ठाकरे हेच चालवत आहेत. हे तुम्हाला सध्या दिसत आहे. इतर लोकं कुणाच्या मागे फरफटत गेले ते सुद्धा दिसत आहे. त्यांची एक इच्छा होती की, ठाकरे नाव हे हिंदुत्वासोबत असलं पाहिजे, आमच्यासोबत असलं पाहिजे. आम्ही त्यांच्यासोबत असलं पाहिजे. आज ती इच्छा पूर्ण होताना दिसत आहे. त्यामुळे ते आनंदात आहे”, असा दावा राजू पाटील यांनी केला.

यावेळी राजू पाटील यांनी संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. “संजय राऊत हे महान व्यक्तीमत्व आहे. त्यांच्याबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही. ते कुठला संदर्भ कधी देतील याचा काही थांगपत्ता नाही. त्यामुळे त्यावर मी जास्त बोलू इच्छित नाही”, अशी प्रतिक्रिया राजू पाटील यांनी दिली.

हेही वाचा :

स्पोर्ट्स, ड्रामा आणि रोमान्स… ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस माही’चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज

नरेंद्र मोंदींनी शरद पवार, उद्धव ठाकरेंना का दिली ऑफर? प्रकाश आंबेडकर

”चंद्रकांत पाटलांना काय कळतं?, फक्त तेरे नाम’ भांग पाडून फिरत असतात”; जरांगे पाटलांनी उडवली खिल्ली