रतन टाटा ‘या’ अभिनेत्रीच्या पडले होते प्रेमात; आजही आहेत चांगले मित्र

भारतीय उद्योजक आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व(ratan tata capital) यांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. बुद्धिमान व्यावसायिक, मदतीसाठी कायमच हात पुढे करणारी व्यक्ती म्हणून रतन टाटा यांची ओळख आहे. पण रतन यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही तितक्याच चर्चा झाल्या आहेत. रतन टाटा हे अविवाहित राहिले असले तरीही ते तरुणपणात काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. यात एका गाजलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीसोबत त्यांचं नाव जोडलं गेलं. या अभिनेत्री होत्या सिमी गरेवाल.

सिमी आणि रतन (ratan tata capital)काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. याबाबत त्यांनी सिमी गरेवाल यांचा गाजलेला शो Rendezvous with Simi Garewal मध्ये याविषयी उल्लेख केला होता. रतन टाटा यांच्यासोबतच्या रिलेशनशिपविषयी सांगताना सिमी एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या होत्या,”आम्ही फार पूर्वी रिलेशनशिपमध्ये होतो. तंटे खूप परफेक्ट आहेत आणि त्यांच्याकडे खूप उत्तम विनोदबुद्धी आहे. पैसा हा कधीच त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा नाहीये आणि परदेशात जितके आरामात असतात तितके ते भारतात नसतात.”

काही कारणामुळे त्यांचं रतन टाटांसोबतचं रिलेशन तुटलं पण तरीही त्यांची मैत्री कायम राहिली. सिमी यांनी त्यांच्या शोमध्ये सुद्धा रतन टाटा यांना आमंत्रित केलं होतं. यावेळी त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही खूप चर्चा केली होती.

रतन हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यात चार वेळा रिलेशनशिपमध्ये होते पण चारही वेळा त्यांचं लग्न ठरता ठरता मोडलं. याचा उल्लेख त्यांनी सिमी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे. या अनुभवांमुळे पुढे रतन टाटा यांनी कधीच लग्न केलं नाही.

कर्ज, मेरा नाम जोकर यांसारख्या सिनेमांमुळे चर्चेत राहिलेल्या सिमी यांचे रिलेशनशिपसुद्धा खूप गाजले. मन्सूर अली खान पतौडी यांच्यासोबतही सिमी काही काळ रिलेशनशिपमध्ये होत्या पण नंतर त्यांचं नातं तुटलं. मन्सूर यांनी पुढे जाऊन अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी लग्न केलं. तर सिमी यांनी रवी मोहन यांच्याशी लग्न केलं जे दिल्लीच्या चुन्नामल परिवाराशी संबंधित होते. पण त्यांचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही.

हेही वाचा :

Paytm मध्ये मोठा बदल; UPI संबंधी करावे लागणार झटपट हे काम

MS धोनी टी-20 वर्ल्ड कपसाठी अमेरिकेला जाणार? रोहित शर्माने केलं मोठं वक्तव्य

‘शीला की जवानी’वर साई पल्लवीचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले ‘कतरिनाही फेल’