‘मॅचआधी मिळाली धमकी, जीवाला धोका…’; पाकिस्तान विरुद्ध सामन्यापूर्वी…: रोहित शर्माचा खुलासा

भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ जेव्हा कधी क्रिकेटच्या मैदानात येतात तेव्हा जगातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष या सामन्याकडे असतं. भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्माने नुकतीच जिओ हॉटस्टारला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यानं सांगितलं की, आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामन्यापूर्वी(match) संघाला धमकी मिळाली होती. त्यामुळे पूर्ण संघ हॉटेलच्या बाहेर गेला नाही. वर्ल्ड कपच्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता.

रोहितने जिओ हॉटस्टारला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘भारत – पाकिस्तान सामन्यापूर्वी (match)आम्हाला सांगण्यात आले होते की एक धमकी आली आहे, काही तरी सुरुये. त्यामुळे सामन्याच्या दोन दिवस आधी आम्हाला हॉटेलमधून बाहेर जाण्याची परवानगी नव्हतो. माहोल बनणं तिथेच सुरु झालं होतं.

आम्ही जेवण ऑर्डर करायचो आणि हॉटेल पूर्ण भरलेलं होतं. चालणं सुद्धा अवघड झालं होतं. फॅन्स, मीडिया सगळेच तिथे होते. तेव्हाच तुम्हाला जाणीव होते की ही केवळ एक मॅच नाही तिथे काहीतरी खास होणार आहे. आम्ही जसं स्टेडियमच्या जवळ पोहोचलो तिथे पहिल्या पासूनच उत्सवाचा माहोल होता. भारतीय फॅन्स, पाकिस्तानी फॅन्स सर्व नाचत होते.

पाकिस्तान विरुद्ध या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी केली आणि 19 ओव्हरला 119 धावांवर ऑलआउट झाले. यावेळी ऋषभ पंतने नंबर 3 वर येऊन 31 बॉलमध्ये 42 धावांची खेळी केली. रोहित शर्माने यावेळी म्हटले की, ‘आम्हाला वाटत होते की फक्त ऋषभ जे सर्वोत्तम करतो ते त्यावेळी करावे, गोलंदाजांना त्रास द्यावा, मोकळेपणाने खेळावे अशी आमची इच्छा होती आणि त्याने ते उत्तम प्रकारे केले. त्याची खेळी सुमारे 42 धावांची होती आणि त्या खेळपट्टीवर ती 70 धावांप्रमाणे होती’. त्यानंतर जसप्रीत बुमराहने तीन विकेट्स घेत भारताला पाकिस्तानला रोखण्यात आणि सहा धावांनी विजय मिळवून देण्यात मदत केली.

पाकिस्तान विरुद्ध अनेक सामने(match) खेळलेल्या रोहित शर्माने सांगितले की, न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्याचा अनुभव काही वेगळाच होता. कारण दोन्ही संघाच्या फॅन्समध्ये मोठी ऊर्जा होती. रोहित म्हणाला, ‘मी अजून पर्यंत अनेक भारत – पाकिस्तान सामने खेळले आहेत, मी संख्या सुद्धा विसरलोय. पण ती प्री मॅच ऊर्जा, ती भावना नेहमी काही वेगळीच असते. त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही’.

हेही वाचा :