कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाने आज विश्रांती घेतली.(water )त्यामुळे इशारा पातळीकडे वाटचाल करणाऱ्या पंचगंगेच्या पातळीत अर्ध्या फुटाने घट झाली. अद्याप ५४ बंधारे पाण्याखाली असून, इतर जिल्हा मार्ग नऊ व ग्रामीण मार्ग १७ असे एकूण २६ मार्ग बंद आहेत. या मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली. पावसाची उघडीप असली तरी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले.गेल्या दोन दिवसांपासून शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. धरणक्षेत्रात तर अतिवृष्टीच झाली. यामुळे नद्यांच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ होऊन पंचगंगेची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू राहिली, परंतु आज सकाळपासून रात्रीपर्यंत पावसाने पूर्णपणे उसंत दिली. त्यामुळे नदी, नाल्यांमधील पाण्याची पातळीही कमी होऊ लागली.
पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे सकाळी आठ वाजता ३५ फूट होती. त्यानंतर दुपारी बारा वाजता यामध्ये एक इंचाची घट झाली. सायंकाळपर्यंत ही पातळी स्थिर राहिली. पुन्हा ही पातळी झपाट्याने उतरून रात्री ३४ फूट सात इंच इतक्या खाली आली. पाणी कमी होऊ लागल्याने दिवसभरात तुळशी नदीवरील बाचणी, आरे, कडवी नदीवरील सरूड-पाटणे, कुंभी नदीवरील शेणवडे व वारणा नदीवरील मांगले-सावर्डे हे बंधारेखुले झाले. दरम्यान, आलमट्टी धरणातून ७० हजार क्युसेक,(water ) राधानगरी धरणातून ३१००, दुधगंगेतून १६००, वारणेतून १७३०, कोयनेतून १०५० क्युसेक विसर्ग सुरू राहिला.
शाहूवाडी तालुक्यात वीज, मोबाईल रेंज ‘गुल’
शाहूवाडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये व दुर्गम भागात गेल्या दहा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. तसेच मोबाईलची रेंजही मिळत नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय झाली आहे.
इचलकरंजीत वरद विनायक मंदिरात पुराचे पाणी
इचलकरंजी येथील पंचगंगा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. (water )सायंकाळी ५९.६ फुटांवर पाणी होते. नदीकाठावर असलेल्या वरद विनायक मंदिरात पुराचे पाणी आले आहे. नागरी वस्तीच्या दिशेने हळूहळू पुराचे पाणी येत आहे. त्यामुळे संभाव्य पूरबाधित क्षेत्रातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.
त्यांनी आज पंचगंगा नदीकाठी भेट देऊन संभाव्य पूरस्थीतीचा आढावा घेतला. यांत्रिक बोटीतून त्यांनी कट्टीमोळा योजनेच्या जॅकवेलपर्यंत जात पूरस्थितीची पाहणी केली. यावेळी उपायुक्त नंदू परळकर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संजय कांबळे उपस्थित होते.
हेही वाचा :