ऐन निवडणुकीत दुःखद बातमी, भाजपच्या ‘या’ माजी खासदाराचं निधन
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार(political news) हरिश्चंद्र चव्हाण यांचे आज 14 नोव्हेंबररोजी सकाळी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खराब होती. अखेर त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपसाठी ही वाईट बातमी समोर आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी कलावती चव्हाण, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
मालेगाव आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार(political news) म्हणून हरिश्चंद्र चव्हाण यांनी गेली अनेक वर्षे काम केलं आहे.पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्येही त्यांनी पदे भूषवली आहेत. भाजपशी एकनिष्ठ असलेले चव्हाण यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
दिंडोरीचे खासदार असताना भाजपचे सरकार वाचवण्यासाठी एअर अँब्युलन्सने ते दिल्ली येथे गेले होते. पक्षाने 2019 च्या पंचवार्षिक निवडणुकीत त्यांना तिकीट दिले नव्हते. मात्र, तरीही ते भाजपसोबत एकनिष्ठा राहून सतत पक्षासाठी कार्य करीत राहिले.
हरिश्चंद्र चव्हाण यांनी 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2014 मध्ये त्यांनी भारती पवार यांचा 2 लाख 47 हजार मतांनी पराभव केला होता. भारती पवार तेव्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निवडणूक लढल्या होत्या. तर, 2019 मध्ये त्या भाजपमध्ये आल्या.
यानंतर भाजपने हरिश्चंद्र पवार यांना उमेदवारी न देता भारती पवार यांना उमेदवारी दिली होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारती पवार यांनी 1 लाख 98 हजार 779 मतांनी विजय मिळवला होता. तर, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही हरिश्चंद्र चव्हाण हे इच्छुक होते.
मात्र, 2024 च्या निवडणुकीतही भाजपने भारती पवार यांनाच संधी दिली.यानंतर हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी दिंडोरी लोकसभेतून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आरोग्याचा प्रश्न समोर करत त्यांनी शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला होता. आता विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन झाल्याने दिंडोरीवर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा :
सोन्याचे दर गडगडले, चांदीचे भाव स्थिर! ग्राहकांची खरेदासाठी मोठी गर्दी
“स्वतःला मर्द समजणाऱ्या ठाकरेंच्या बॅगमध्ये लिपस्टिक-लाली..”; नितेश राणेंची खोचक टीका
“तुम्ही ज्यावर प्रेम केलं, तो सूरज आता तसा नाही…”; कोकण हार्टेड गर्लने वादावर मौन सोडलं
आज अनेक शुभ योग; 4 राशींना होणार डबल लाभ, पाण्यासारखा पैसा कमवणार