‘शीला की जवानी’वर साई पल्लवीचा जबरदस्त डान्स; नेटकरी म्हणाले ‘कतरिनाही फेल’

बॉलिवूडमधील काही आयटम साँग(dance) तुफान गाजली. या गाण्यांना कितीही वर्षे झाली असली तरी सोशल मीडियावर ती कायम हिट असतात. अभिनेत्री कतरिना कैफचं ‘शीला की जवानी’ हे आयटम साँग अशाचपैकी एक आहे. या गाण्यावर आजवर अनेकांनी परफॉर्म केलं. पण कतरिनाला टक्कर देण्यात कोणाला यश मिळालं नव्हतं.

मात्र आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एका लोकप्रिय अभिनेत्रीने कतरिनाला तोडीस तोड डान्स(dance) केला आहे. तिच्या डान्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून साई पल्लवी आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तीस मार खां’ या चित्रपटातील ‘शीला की जवानी’ या गाण्यावर तिने जबरदस्त डान्स केला आहे.

साई पल्लवी तिच्या सौंदर्यामुळे, अभिनयामुळे आणि डान्समुळे विशेष लोकप्रिय आहे. कोणत्याही मेकअपशिवाय वावरणारी साई तिच्या नैसर्गिक सौंदर्याने अनेकांचं लक्ष वेधलंय. तिने फेअरनेस क्रिमच्या कोट्यवधींच्या जाहिराती धुडकावल्या आहेत. या गोष्टींमुळे चाहत्यांच्या मनात साईविषयी खूप प्रेम आहे. डान्सच्या माध्यमातूनही साई प्रेक्षकांची मनं जिंकते.

एका रिअॅलिटी शोमधील तिचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर आता कॉलेज फेस्टिव्हलमधील साई पल्लवीचा डान्स हिट ठरतोय. कतरिनाच्या प्रसिद्ध ‘शीला की जवानी’ या गाण्यावर ती ज्याप्रकारे थिरकतेय, ते पाहून चाहते पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडले आहेत.

https://twitter.com/i/status/1780217103863390411

साईने 2008 मध्ये ‘उंगलिल यार अदुथा प्रभू देवा’ नावाच्या एका डान्स रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर 2009 मध्ये ती ‘धी-4’चाही भाग बनली होती. साईला डान्सची खूप आवड आहे. सध्या साई तिच्या आगामी प्रोजेक्टमुळेही चर्चेत आली आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ या चित्रपटात ती सीतेची भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. याबद्दल अद्याप तिच्याकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र साईला सीतेच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. तर या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर हा प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे.

हेही वाचा :

वर्ल्डकपबाबतच्या सर्व बातम्या खोट्या! रोहित शर्माने मोठा खुलासा करत सांगितलं सत्य

गुगलचा पुन्हा कर्मचाऱ्यांना नारळ, भारतातील कामावर होणार परिणाम

मला शाहरुखसोबत रोमँटिक चित्रपट करायचा आहे; विद्या बालनने बोलून दाखवली मनातील इच्छा