मला शाहरुखसोबत रोमँटिक चित्रपट करायचा आहे; विद्या बालनने बोलून दाखवली मनातील इच्छा

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन(romantic film) ही प्रेक्षकांची मने जिंकत असते. विद्या बालनचा ‘दो और प्यार दो’ हा चित्रपट १९ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान एका मुलाखतीत तिने शाहरुख खानसोबत चित्रपटात काम करायची इच्छा असल्याचे सांगितले आहे.

विद्या बालन आणि शाहरुख खान ही जोडी आतापर्यंत एकदाही मुख्य भूमिकेत चाहत्यांच्या भेटीला आली नाही. शाहरुख खानने २००७ मध्ये विद्या बालनच्या ‘हे बेबी’ चित्रपटात(romantic film) केमिओ केला होता. त्यानंतर शाहरुखच्या ‘ओम शांती ओम’मध्येही विद्या बालनने छोटीशी भूमिका साकरली होती. त्यानंतर चाहते विद्या बालन आणि शाहरुख खानला एकत्र पाहायला उत्सुक आहेत. तर आता विद्या बालननेच शाहरुखसोबत रोमँटिक चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अभिनेत्री विद्या बालन सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पिंकविला या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने शाहरुखसोबत करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले आहे. मुलाखतीत विद्याला विचारण्यात आले की, तुला कोणत्या स्टार्ससोबत काम करायला आवडेल. त्यावर विद्या बालनने बॉलिवूडचा किंग शाहरुख खानसोबत काम करायला आवडेल असे सांगितले.

‘शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटात माझी छोटीशी भूमिका होती. मला शाहरुखसोबत रोमँटिक चित्रपट करायला नक्की आवडेल’, असे विद्या बालनने सांगितले.

विद्या बालन आणि शाहरुख खानने आजपर्यंत कधीच एकत्र काम केले नाही. त्यांची जोडी ही चाहत्यांना खूप आवडते. त्यामुळे त्यांची जोडी एकत्र मोठ्या पडद्यावर दिसावी अशी इच्छा चाहत्यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर आता ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार का यासाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

हेही वाचा :

गुगलचा पुन्हा कर्मचाऱ्यांना नारळ, भारतातील कामावर होणार परिणाम

भारतात लवकरच होणार स्टारलिंकची एंट्री, इलाॅन मस्कच्या दौऱ्यात होऊ शकते घोषणा

वर्ल्डकपबाबतच्या सर्व बातम्या खोट्या! रोहित शर्माने मोठा खुलासा करत सांगितलं सत्य