‘सलाम रोहित भाई…’ मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा आज वाढदिवस. आज रोहित(india match) 37 वर्षांचा झाला. दिग्गज भारतीय क्रिकेटपटू रोहितने भारतीय क्रिकेटला खूप काही दिले आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नसली तरी संपूर्ण जग त्याच्या कर्णधाराचे कौतुक करत आहे.

रोहित शर्मा हा असा खेळाडू आहे जो तिन्ही फॉरमॅटचा(india match) हिरो आहे. टी-20 असो, एकदिवसीय क्रिकेट असो किंवा कसोटी क्रिकेट, तिन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्माचे योगदान मोलाचे आहे. आज रोहितचा वाढदिवस मुंबई इंडियन्सने अनोख्या पद्धतीने साजरा केला.

मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रोहित शर्माचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आणि हा व्हिडिओ चाहत्यांनाही खूप आवडला. व्हिडिओमध्ये रोहितला राजासारखा दाखवण्यात आला आहे. या व्हिडिओच्या प्लेबॅक गाण्यात सलाम रोहित भाई असे म्हटले जात आहे. केजीएफ चित्रपटात एक गाणे आहे, सलाम रॉकी भाई. या गाण्याच्या बोलांवर रोहित शर्मासोबत हे गाणंही बनवण्यात आलं आहे.

रोहित शर्माची क्रिकेट कारकीर्द खूपच चमकदार राहिली आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने एकूण 59 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 17 अर्धशतके आणि 12 शतकांसह एकूण 4138 धावा केल्या आहेत. रोहितची कसोटी क्रिकेटमध्ये सरासरी 45.47 आहे.

https://twitter.com/i/status/1785019560229233140

याशिवाय त्याने 262 एकदिवसीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये हिटमॅनने 49.12 च्या सरासरीने 10709 धावा केल्या आहेत. रोहितने वनडेमध्ये 55 अर्धशतके आणि 31 शतके झळकावली आहेत. याशिवाय रोहित शर्माचा टी-20 क्रिकेटमधील रेकॉर्डही अप्रतिम आहे. रोहितने एकूण 151 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 31.29 च्या सरासरीने 3974 धावा केल्या आहेत.

हेही वाचा :

मे महिन्यात ‘या’ 5 राशींचं प्रत्येक स्वप्नं होईल साकार

मानसिक आरोग्यासाठी ‘डान्स’ अत्यंत फायदेशीर, मिळतील 4 जबरदस्त फायदे

‘मुसलमान सर्वाधिक कंडोमचा करतात वापर’, ओवेसींचे म्हणणे तरी काय